जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raigad District Bank Fire : कर्जतमध्ये अग्नितांडव, रायगड जिल्हा बँकेला लागली आग, कागदपत्र जळून खाक LIVE VIDEO

Raigad District Bank Fire : कर्जतमध्ये अग्नितांडव, रायगड जिल्हा बँकेला लागली आग, कागदपत्र जळून खाक LIVE VIDEO

Raigad District Bank Fire : कर्जतमध्ये अग्नितांडव, रायगड जिल्हा बँकेला लागली आग, कागदपत्र जळून खाक LIVE VIDEO

रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरातील रायगड जिल्हा बँकेला भीषण आग लागली होती.

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील (रायगड), 05 फेब्रुवारी : रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरातील रायगड जिल्हा बँकेला भीषण आग लागली होती. शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातील श्री कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ही बँक आहे. ही आग पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत संपूर्ण शाखा जळून खाक झाली आहे. याप्रकरणी आग विझवण्याचे काम अद्यापही सुरू आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

जाहिरात

घटनास्थळी कर्जत नगरपरिषदेचे अग्निशमन दल, तसेच खोपोली येथील अग्निशमन दल पोहचवून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अजूनही कुलिंग चे काम सुरू आहे.

हे ही वाचा :  पवारांशी बोलले, राज ठाकरेंशी बोलले, पण मुख्यमंत्री शिंदेंनी टाळला ‘मातोश्री’वर फोन

अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरत एकाच खळबळ उडाली होती. पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याने यावेळी नागरिक गाढ झोपेत होते. तर कामाला जाणाऱ्या नागरिकांना ही आग दिसून आल्याने माहिती झाल्याचे सांगण्यात आलं.

मात्र या आगीत बँक पूर्ण जळून खाक झाली आहे.आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून प्रथम दर्शनी ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मात्र काही नागरिक  संशय व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात