सोलापूर, 13 जून: सध्या राज्यात अनलॉक (Unlock) करण्यात येत असलं तरी अद्याप कोरोना विषाणूचा (Corona virus) धोका संपलेला नाही. कोरोना साथीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले, तोपर्यंतच नागरिकांना कोरोना संसर्गाचा विसर पडला आहे. सोलापूरच्या (Solapur) एका प्रसिद्ध डान्सबारमध्ये (Dance bar) क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश दिल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे याठिकाणी बारबालांकडून अश्लील नृत्य (half naked dance) करून घेतलं जात होतं. तसेच काहीजण या बारबालांवर चलनी नोटांची उधळण करत होते. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकून 8 नृत्यांगनांसोबतच 29 जणांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाची पुढील कार्यवाही केली जात आहे. सोलापूर शहरातील हॉटेल पॅराडाईजमध्ये अश्लील नृत्य सुरू असून काहीजण चलनी नोटांची उधळण करत असल्याची माहिती सोलापूर गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी गुन्हे शाखेच्या पथकासह हॉटेल पॅराडाईजवर छापा टाकला. यावेळी 8 नृत्यांगना अर्धनग्न अवस्थेत अश्लील डान्स करत होत्या. तर काहीजण त्यांच्यावर चलनी नोटांची उधळण करत होते. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचा मालक बाब जाफर याचा मुख्य हस्तक संजय पोळ, हॉटेल मॅनेजर मुकेशसिंग बायस यांच्यासह 8 नृत्यांगना आणि 27 ग्राहकांना ताब्यात घेतलं आहे. यातील बरेच ग्राहक दारुच्या नशेत होते. सोलापूरमध्ये मनोरंजानांची ठिकाणं केवळ 50 टक्के क्षमतेनं खुली ठेवण्याची परवानगी असताना याठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देण्यात आला होता. त्याचबरोबर अवैध पद्धतीने बारबालांकडून डान्स करून घेतला जात होता. हे ही वाचा- संतापजनक! आई 4 दिवस करत होती दारू पार्टी, बाळाचा भूकेनं तडफडून मृत्यू त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा आणि बारमधील ग्राहकांना विनापरवाना मद्य पुरवल्याचं देखील पोलिसांच्या लक्षात आलं आहे. खरंतर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, अशा पद्धतीने एकत्र येऊन सार्वजानिक आरोग्य धोक्यात घालण्यात येत आहे. त्यामुळे अशा हॉटेल आणि डान्सबारवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सोलापूर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.