मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राऊतांचा अनुभव मोठा, त्यांना सिल्वर ओकवरून....; राधाकृष्ण विखे पाटलांचा जोरदार हल्लाबोल

राऊतांचा अनुभव मोठा, त्यांना सिल्वर ओकवरून....; राधाकृष्ण विखे पाटलांचा जोरदार हल्लाबोल

 महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज संविधान दिन साजरा झाला. यानंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India
  • Published by:  Ajay Deshpande

शिर्डी : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज संविधान दिन साजरा झाला. यानंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.  विखे पाटलांनी यावेळी संजय राऊत आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्क्रिप्ट लिहिणं आणि लिहून दिलेल्या स्क्रिप्ट वाचन याचा संजय राऊत यांना मोठा अनुभव असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले विखे पाटील?  

यावेळी बोलताना विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्क्रिप्ट लिहिणं आणि लिहून दिलेल्या स्क्रिप्ट वाचन याचा संजय राऊत यांना मोठा अनुभव आहे.  महाविकास आघाडी सरकार असताना संजय राऊत यांना सिल्वर ओकमधू स्क्रिप्ट येत होत्या. त्यांच्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीवर निशाणा 

दरम्यान यावेळी त्यांनी कर्नाटक वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.  तीव्र लोक भावना असलेल्या गावांमध्ये लक्ष घालणार आहे. विशेष पॅकेज देऊन त्यांच्या समस्या सोडवणार आहे. गेले अनेक वर्ष त्या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर प्रतिक्रिया   

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  कामाख्या देवी हे लोकांच श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थानी जाणं आणि दर्शन घेणं यात काही वावगं नाही. ज्या लोकांना जनतेने नाकारले त्यांच्याकडून यावर टीका होण साहाजिक अल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

First published: