पुणे, 5 सप्टेंबर : बाप्पाचे भक्त फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत, हे पुण्यातील एका व्हिडीओमधून सिद्ध होतं. थाडलँडहून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि मनोभावे बाप्पाची आरतीही केली. बाप्पाची आरतीदेखील त्यांची तोंडपाठ होती. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. गणेशोत्सव हा सुंदर सण आहे, अशी भावना थायलंड या देशातून आलेल्या परदेशी गणेशभक्तांनी व्यक्त केली आहे. थायलँडमधून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष केला. विशेष म्हणजे बाप्पाची आरती त्यांना तोंडपाठ होती.
थायलँड देशातून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं, विशेष म्हणजे बाप्पाची आरतीही म्हणाले. pic.twitter.com/M9h0RzdIyj
— News18Lokmat (@News18lokmat) September 5, 2022
अगदी बेंबीच्या देठापासून ते बाप्पाचा जयघोष करीत होते. दगडूशेठ’चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झालेले आहेत. याठिकाणी करण्यात आलेली सुंदर सजावट पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
थायलँड देशातून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांनी आपली भावना यावेळी व्यक्त केली... pic.twitter.com/tNZN6jSY20
— News18Lokmat (@News18lokmat) September 5, 2022
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यावर्षी साकारण्यात आलेल्या ‘श्री पंचकेदार मंदीर’ सजावटीसमोर गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली. हे मंदिर केवळ देखावा नसून याच्या उभारणीत अनेक प्रतिकांचा, मूर्तींचा आणि अनेक दिव्यांचा वापर केलेला आहे.