पुणे, 12 ऑगस्ट : कॉमनवेल्थ गेम्स (commonwealth games 2022) स्पर्धेचा थरार अनुभवल्यानंतर क्रीडा फॅन्सना आता खो-खो लीगचे वेध लागले आहेत. येत्या रविवारपासून पुण्यातील बालेवाडी स्टेडिअममध्ये अल्टिमेट खो-खो लीगचा (Ultimate Kho Kho Leauge) पहिला सिझन सुरू होणार आहे. या लीगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मुंबई खिलाडीज (Mumbai Khiladis) टीम करणार आहे. मुंबईची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जात आहे. या टीममध्ये रोजच्या आयुष्यात गरिबी अनुभवलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. मुंबईचा कॅप्टन विजय हजारे (Vijay Hazare) हा पानटपरी चालकाचा मुलगा आहे. तर मुंबईच्या टीमचा प्रमुख आधारस्तंभ असलेला मिलिंद कुरपे (Milind Kurpe) हा लॉन्ड्रीचालकाचा मुलगा आहे.
आईकडून बाळकडू
मिलिंदला खो-खो चे बाळकडू त्याच्या आईकडून मिळाले. मिलिंदच्या आई शाळेत असताना खो-खो खेळत. कौटुंबिक कारणांमुळे त्यांना हा खेळ पुढे खेळता आला नाही. पण, आईमुळेच त्याला खेळाची आवड निर्माण झाली. आईबरोबरच वडिलांनी देखील आपल्याला खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी पाठिंबा दिला, असे मिलिंद सांगतो.
आपण शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्य गोष्टी कराव्या अशी सुरूवातीला घरच्यांची इच्छा होती. पण, माझी खेळातील प्रगती पाहून त्यांचा माझ्यावरील विश्वास वाढला. त्यानंतर घरांच्यानी मला नेहमीच पाठिंबा दिला. मध्यंतरीच्या काही काळात माझा फॉर्म हरपला होता. दुखापतींमुळेही कारकिर्दीला सेटबॅक बसला. त्याचा परिणाम टीममधील निवडीवर होत असे. या अवघड काळात घरच्यांनी आणि मित्रांनी खंबीर साथ दिली.' असे मिलिंद सांगतो.
गरिबीला 'खो' देऊन बनला मुंबईचा कॅप्टन, पानटपरी चालकाच्या मुलाचं नशीबच बदललं! VIDEO
मिलिंदचा प्रवास
मिलिंदनं खो-खोमधील वेगवेगळ्या पातळीवर स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यानं यापूर्वी खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. मिलिंदचा हा अनुभव मुंबई खिलाडीजला या स्पर्धेत उपयोगी ठरणार आहे. टीमचा आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.