पुणे, 31 ऑगस्ट : गणपती बाप्पाचे आज (बुधवार) सर्वत्र आगमन (Ganesh Chaturthi) होत आहे. यंदा दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा होणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडळांनी केलेल्या देखाव्या प्रमाणेच आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पुणेकर आणि बाहेरगावची मंडळी शहरातील मध्यवस्तीमध्ये येत असतात. पुणेकरांच्या या गर्दीमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून बुधवारी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. काय आहे बदल? गणेशमुर्ती विक्रीचे स्टॉल हे मोठ्या संख्येने डेंगळे पुल ते शिवाजी पुलाच्या श्रमिक भवन समोर व कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक तसेच मंडई आणि सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या भागात आहेत. त्यामुळे या भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. शिवाजी रोड गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. संचेती चौकाकडून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून , जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत. मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. कधी आणि कशी कराल गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना, लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी VIDEO वाहतुकीस खुले रस्ते फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते खुडे चौक Ganesh Chaturthi: यंदा नातेवाईकांसोबत करा गणरायाचं स्वागत; व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा ‘या’ सुंदर निमंत्रण पत्रिका अशी असेल पार्किंगची व्यवस्था महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौकदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लावण्यास परवानगी असेल. टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावण्यास परवानगी असेल. मंडईतील सतीश मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ येथे वाहने लावता येतील. शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावता येणार आहेत. दरम्यान, शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्य पीएमपी बसच्या मार्गात बदल केला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.