जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील भीषण आगीत लग्नासाठी आणलेले साहित्य नष्ट, 15 घरं जळून खाक

पुण्यातील भीषण आगीत लग्नासाठी आणलेले साहित्य नष्ट, 15 घरं जळून खाक

पुण्यातील भीषण आगीत लग्नासाठी आणलेले साहित्य नष्ट, 15 घरं जळून खाक

पुण्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास हडपसर, वैदुवाडी आणि रक्षकनगर भागामध्ये ही आग लागली. आगीत घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 17 जुलै : पुण्यातील रक्षकनगरमध्ये आग लागून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. या भीषण आगीत तब्बल 15 घरे जळून खाक झाली आहेत. इतकेच नव्हे तर लग्नासाठी आणलेले साहित्यही जळून खाक झाले आहे. तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संसारपयोगी वस्तू जळाल्या आहेत. मदतीचे आवाहन - पुण्यात यापूर्वी वैदुवाडी परिसरातील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली होती. हडपसर परिसरातील झोपडपट्टीला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आगीनंतर दरवेळी रहिवाशांना प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन मिळते. मात्र, योग्य प्रमाणात मदत मिळत नाही. काल मध्यरात्री लागलेल्या आगीत नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांनी मदतीचे आवाहन केले आहे. ही आग बघायला बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोणत्या ठिकाणी आग - पुण्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास हडपसर, वैदुवाडी आणि रक्षकनगर भागामध्ये ही आग लागली. आगीत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रहिवाशांकडे अंगावरील कपड्याशिवाय काही राहिलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. हेही वाचा -  पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबाल तर बसेल डबल तडाखा! इतकेच नाहीतर वैदुवाडीतील एका कुटुंबातील मुलीचे लग्न तोंडावर असल्याने लग्नाशीसंबंध आणलेले सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. ही आग रात्रीच्या वेळी लागल्याने सुरूवातीला रहिवाशांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune , pune fire
  • First Published :
जाहिरात
जाहिरात