जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / suicide attempt Baramati : बारामतीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला अन् युवकाने उचलले टोकाचे पाऊल, पुढे जे झालं ते वेगळचं

suicide attempt Baramati : बारामतीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला अन् युवकाने उचलले टोकाचे पाऊल, पुढे जे झालं ते वेगळचं

suicide attempt Baramati : बारामतीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला अन् युवकाने उचलले टोकाचे पाऊल, पुढे जे झालं ते वेगळचं

दारूच्या नशेत मी आत्महत्याच करतो म्हणून बारामतीत असलेल्या मोठ्या स्टेडियमच्या उंच छतावर जात आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. (suicide attempt Baramati)

  • -MIN READ Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

बारामती, 22 सप्टेंबर : किरकोळ कारणावरून घरात भांडण झाल्याने एका युवकाने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. तो दारूच्या नशेत मी आत्महत्याच करतो म्हणून बारामतीत असलेल्या मोठ्या स्टेडियमच्या उंच छतावर जात आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. (suicide attempt Baramati) दरम्यान त्या युवकाला वाचवण्यासाठी बारामती पोलिसांनी नामी शक्कल लढवत वाचवले आहे. दरम्यान त्यांला वाचवण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न करावे लागले. त्यामुळे या युवकाला खाली घेण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

जाहिरात

बारामतीमध्ये राहणाऱ्या एका युवकाच्या घरात किरकोळ भांडण झाले. दरम्यान तो नशेत होता यामुळे तो आत्महत्या करतो म्हणून घरातून निघाला होता. दिनेश हनुमंत मिसाळ (वय 22) राहणार आमराई असे त्या युवकाचे नाव आहे. हा घरात आईसोबत किरकोळ वाद झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमला लागून असलेल्या पिडीसी बँकेच्या बाजूने छतावर चढला. सदर युवक हा दारूच्या नशेत होता. घरात किरकोळ वाद झाल्याने त्याची मनस्थिती बरोबर नव्हती. त्याने थेट स्टेडियम गाठत आत्महत्येचा इशारा दिला.

हे ही वाचा :  पुण्यात 2 इमारतींच्या रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी; महिलाही जखमी, घटनेचा Shocking Video

दरम्यान ही घटना बारामती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांची गर्दी सुद्धा त्या ठिकाणी होऊ लागली. त्यावेळेस पोलिसांनी सदर परिस्थिती कौशल्याने हाताळून, त्याला खालून भावनिक आवाहन करून. पोलीस मित्र व समाजसेवक यांची मदत घेऊन. त्याला खाली परत उतरण्याचे आवाहन केले.

जाहिरात

युवक दारूच्या नशेत आसल्याने उंचीवरून त्याला परत उतरणे हे सुद्धा अवघड होते. त्याचा तोल गेला असता तर एखादी अप्रिय घटना घडली असती. परंतु पोलिसांनी अतिशय कौशल्याने सदर परिस्थिती हाताळली व सदर युवकाला खाली उतरून त्यांचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्याच वेळेस पोलिसांनी फायर ब्रिगेडला सुद्धा उंच सीडीसाठी पाचरण केले होते. परंतु फायर ब्रिगेड येण्याअगोदरच पोलीस त्याला भावनिक आवाहन करून खाली घेण्यात यशस्वी झाले होते.

जाहिरात

हे ही वाचा :  पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो बॉयकडून तरुणीचा किस, पुण्यातली खळबळजनक घटना

जाचाला कंटाळून लेखाधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल

राज्यासह पुण्यातही आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पुण्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. पुण्यातूनआणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील लेखाधिकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेश शंकर शिंदे (वय 52), असे मृताचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात