जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांनाही पळून जावे लागणार; गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका

श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांनाही पळून जावे लागणार; गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका

श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे शरद पवारांनाही पळून जावे लागणार; गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका

पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते.

  • -MIN READ Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 6 सप्टेंबर : ज्याप्रमाणे श्रीलंकेतील नेते पळून गेले होते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पळून जावे लागणार आहे, अशी टीका भाजपचे विधानपरिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजपकडून मिशन बारामती या निमित्ताने आयोजित मेळाव्यात पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. काय म्हणाले पडळकर - 2024 ला पवारांचे विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत. एखाद्याला फसवून घ्यायचे, लुबाडून घेण्यात बारामतीकारांना फार आनंद असतो. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या. आता निर्मला सीतारामन या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांनाही नाही, अशी टीका पडळकर यांनी केली. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा. तसेच बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी आहे आणि मी ही टेकडी दोन वर्ष ठोकून काढत आहे, अशी टिकाही त्यांनी केली. निर्मला सीतारमन बारामतीला भेट देणार - दरम्यान, लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. बारामतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दौरा आहे. बारामती, शिरुर, हातकणंगले आणि कोल्हापूर या लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. 22, 23 आणि 24 रोजी प्रत्येक लोकसभा मतदार संघाला एक एक प्रभारी म्हणून केंद्रिय मंत्री निवडलेला आहे. त्यात बारामतीची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे देण्यात आली आहे. ते याठिकाणचा दौरा करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात