पुणे, 27 ऑगस्ट : रिक्षा प्रवास महागणार असल्याने पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणेकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यात रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीदेखील पुण्यात रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली होती.
यंदा पहिल्या 1.5 किमीसाठी 21 ऐवजी 25 रूपये मोजावे लागणार आहे. तर त्यापुढे प्रत्येक किमीला 14 ऐवजी 17 रूपये मोजावे लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. गेल्या 10 वर्षातील ही तिसरी रिक्षा भाडेवाढ आहे. इंधन आणि सीनजी दर वाढीमुळे रिक्षावाल्यांनीही दरवाढीची मागणी केली होती. आरटीओ, रिक्षा संघटना आणि कलेक्टरच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आरटीओ डॉ. अजित शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Autorickshaw driver, Pune