जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फडणवीसांनी घोषणा केलेला प्रकल्प जुनाच, राष्ट्रवादीच्या नेत्याने केली पोलखोल

फडणवीसांनी घोषणा केलेला प्रकल्प जुनाच, राष्ट्रवादीच्या नेत्याने केली पोलखोल

अशाच पद्धतीने महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे'

अशाच पद्धतीने महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे'

अशाच पद्धतीने महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे'

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 02 नोव्हेंबर : रांजणगाव इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रोजेक्ट बाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मोठा खुलासा केला आहे. हा प्रकल्प जुनाच आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोपच पाटील यांनी केला आहे. राज्यात एकापाठोपाठ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. पण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘प्रकल्प जुनाच असून केंद्र आणि राज्य सरकार दिशाभूल करत आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे’ असा घणाघात पाटील यांनी केला. (शिंदे सरकारला केंद्राकडून गिफ्ट, महाराष्ट्रात येणार आता 2 नवे प्रकल्प!) ‘महाराष्टातील अनेक प्रकल्प हे राज्यातून बाहेर जात असताना अनेक आर्थिक केंद्र दुसऱ्या राज्यात जात आहेत. एअर इंडियाचं कार्यालय दुसऱ्या राज्यात गेलं आणि आता जर कोणी रांजणगावमध्ये असा प्रकल्प आणल्याच्या घोषणा करत असेल तर रांजणगाव एमआयडीसी सुरू झाल्या पासून हजारो कंपन्या आल्या हजारो कोटींची गुंतवणूक करून मोठा रोजगार आधीच निर्माण झाला आहे’ असंही पाटील म्हणाले. (फेस टू फेस चर्चा कराच, आदित्य ठाकरे यांचं थेट फडणवीसांना चॅलेंज, म्हणाले..) आता अशा प्रकारे कंपनी आली, पाच हजार लोकांना रोजगार मिळेल अशी समजूत काढण्याच काम केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत करत आहे. ही एक प्रोसेस असून हा प्रकल्प नव्याने आलंय असं काही मानायचं कारण नाही असा टोमणा पाटील यांनी फडणवीसांना मारला. याच विषयावर स्थानिक आमदार अशोक पवार यांनी सुध्दा राज्य व केंद्र सरकारचा पोलखोल केलाय. रांजणगाव येथील IFB चा आलेला प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या सरकार च्या काळात आलेला आहे. या प्रकल्पासाठी जी जागा आरक्षित केली गेली ती महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे. या जागेवर इलेक्ट्रिक झोन हा मागेच जाहीर करण्यात आलेला आहे या सरकारने नवीन काही केलं नाही’ असंही अशोक पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात