पुणे, 22 मे: आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत सभेत बोलताना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी औंरगाबादेत एमआयएमचा खासदार (MIM MP in Aurangabad) झाला यासाठी शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. यांनी MIM ला मोठं केलं बघता बघता त्यांचा खासदार झाला, अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
यांच्या राजकारणात त्या औंरगाबादेत एमआयएमचा खासदार झाला, यांना भुशभुशीत जमीन त्यांना दिली कोणी, शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार, अफझल खान शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता, असं म्हणाले, तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, अशा टीका राज ठाकरेंनी केली आहे.
पुन्हा टेन्शन..! 11 देशांमध्ये Monkeypox चा शिरकाव, रुग्णांचा आकडा वाढतोय
पुढे राज ठाकरे म्हणाले की, देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि औरंगाबादचं नामांतर करा, अशी तीन मागण्या नरेंद्र मोदींकडे आहेत. राजकारणासाठी हिंदू मुस्लीमांच्या विरोधात बोलण्यासाठी MIM ला मोठं केलं. आपण एक राक्षस वाढवतोय, हे लक्षात आलं नाही.
राज ठाकरेंची टीका
MIM चा खासदार निवडून आला. शिवसेनेचा तिकडचा खासदार पडला आणि MIM चा खासदार निवडून आला, अशी टीका राज ठाकरेंनी केली. औरंगजेब हा शरद पवार यांना सुफी संत वाटतो का? अफजलखान हा त्याचं राज्य वाढवायला आला होता असं म्हणतात. तो शिवाजी महाराजांना मारायला आला होता, असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फक्त सांगावं त्यांच्यावर एक तरी केस आंदोलनाची आहे का, असा सवाल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले. पण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का? मराठीचा प्रश्न असो, हिंदुत्वाचा प्रश्न असो एक तरी केस आहे का?, परवा संभाजीनगरच्या नामांतरावरुन राज ठाकरेंनी तुम्ही सरदार पटेल की महात्मा गांधी आहे. मी बोलतोय ला काय लॉजिक आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
Alert..! उकाड्यापासून काहीसा दिलासा, 'या' राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
पुढे राज ठाकरे म्हणाले की, केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, असा सवाल उपस्थित केला. तसंच संभाजीनगरचं भाषांतर झालं तर कशा वर बोलायचं, असा सवाल ही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MIM, MNS, Raj Thackeray (Politician)