नवी दिल्ली, 22 मे: देशाची राजधानी दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतातील लोकांना भीषण उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शनिवारी हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab), दिल्ली आणि राजस्थानच्या (Delhi and Rajasthan) अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शनिवारी या भागातील तापमान (temperature) 4 ते 5 अंश सेल्सिअसनं खाली आले. पुढील दोन-तीन दिवस या भागात आल्हाददायक वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पण देशाच्या पश्चिम आणि मध्य (western and central India) भारतासाठी कोणतीही चांगली बातमी नाही. सध्या तिथे उन्हाळा राहणार आहे. IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात चक्रीवादळ आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस येथे पाऊस सुरू राहणार आहे. यासह या भागांमध्ये त्याचा प्रभाव असल्याने धुळीचे वादळ देखील होऊ शकते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये हलक्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. याशिवाय येथे 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. दिल्लीत हवामान बदलले शनिवारी पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. या कालावधीत कमाल तापमान 42.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. IMD ने वायव्य भारतात 23 आणि 24 मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 22 मे पर्यंत दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढू शकतो आणि ही स्थिती 24 मे पर्यंत कायम राहू शकते. हवामान खात्याने 23 आणि 24 मे साठी यलो अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये पावसाचा इशारा स्कायमेट हवामानानुसार, मेघालय, आसामचा पश्चिम भाग, सिक्कीम, केरळ आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, किनारपट्टी कर्नाटक, पश्चिम हिमालय, लक्षद्वीप आणि पूर्व बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू दुसरीकडे पीटीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केरळमधील किमान 10 जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने येथे ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, मलप्पुरम आणि कोझिकोड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.