जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune Weather : पुण्यात पावसाची तुफान बॅटींग; मात्र, पुणेकरांच्या आनंदावर 'या'मुळे विरजण..

Pune Weather : पुण्यात पावसाची तुफान बॅटींग; मात्र, पुणेकरांच्या आनंदावर 'या'मुळे विरजण..

Pune Weather : पुण्यात पावसाची तुफान बॅटींग; मात्र, पुणेकरांच्या आनंदावर 'या'मुळे विरजण..

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD ALERT) राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 10 जून : यंदा राज्यासह देशभरात उष्णतेच्या झळा मार्च महिन्यापासून जाणवू लागल्या. (Maharashtra Heat Wave) महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात तापमानाचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे. या उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. (Pune Rain Update) हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD ALERT) राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. याठिकांची ढगांची गर्दी झाल्याने वरुणराजाची बरसात सुरू झाली आहे. यावेळी विजा आणि ढगांचा कडकडाट पाहायला मिळाला. पहिल्या पावसाचा आनंद पुणेकरांना घेता आला असता. मात्र, ठिकठिकाणची गटारे तुंबल्याने पावसाचं पाणी रस्त्यावर साचले. यामुळे पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडले. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरतील नाले आणि गटार सफाईची कामे पूर्ण झाली असती. तर जागो जागी असं रस्त्यावर पाणी तुंबल नसते. पुण्यातील अल्का चौकापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना रस्ता शोधवा लागतो, अशी स्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे. हेही वाचा -  Watermelon farming : एक एकरात साडेतीन लाखांचे कलिंगड; बारामतीच्या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर (JJAS) मध्ये मान्सूनची संभाव्यता खालीलप्रमाणे आहे : • अतिरिक्त पावसाची शक्यता 0 टक्के (LPA पेक्षा 110 टक्के अधिक मोसमी पाऊस) • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 105 ते 110 टक्क्यांदरम्यान असतो) • सामान्य पावसाची शक्यता 65 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 96 ते 104 टक्क्यांदरम्यान असतो) • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 25 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 90 ते 95 टक्क्यांदरम्यान असतो) • दुष्काळाची शक्यता 0 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 90 टक्क्यांपेक्षा कमी आहे) 2022 मध्ये कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल: • 166.9 मिमी या सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 107 टक्के पाऊस पडू शकतो • सामान्य पावसाची शक्यता 70 टक्के. • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 10 टक्के 285.3 मिमी या सरासरीच्या तुलनेत जुलैमध्ये 100 टक्के पाऊस पडू शकतो • सामान्य पावसाची शक्ययता 65 टक्के • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 15 टक्के 258.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 95 टक्के पाऊस पडू शकतो • सामान्य पावसाची शक्यता 60 टक्के • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के 170.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 90 टक्के पाऊस पडू शकतो. • सामान्य पावसाची शक्यता 20 टक्के • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 70 टक्के

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात