मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune School: पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, पुणे मनपाचा मोठा निर्णय

Pune School: पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, पुणे मनपाचा मोठा निर्णय

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

Pune School closed: पुण्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.

पुणे, 30 नोव्हेंबर : राज्यभरातील प्राथमिक शाळा सुरू (Primary School reopen) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मोठ्या शहरांकडून शाळा सुरू करण्यास नकार दिला जात आहे. पुण्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 15 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे मनपाने दिली आहे. (Pune Municipal Corporation declared primary school closed till 15 December)

पहिली ते आठवीच्या शाळा आता 15 डिसेंबपरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मनपाने घेतला आहे. तर 15 डिसेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं पुणे मनपाने सांगितलं आहे.

पुण्यातील पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज मनपाच्या बैठकीत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल, 100 पैकी 92 प्रश्न फोडले!

मुंबईत उद्यापासून सुरु होणार नाहीत

मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) शाळा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आताच समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेकडून उद्यापासून शाळा सुरु होणार नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून 1 तारखेपासून शाळा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार नाही आहेत.

मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्यापासून नाहीतर 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. मुंबई पालिकेनं ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे उद्या शाळा सुरू होणार की नाही ? शिक्षक आणि पालकांसमोर प्रश्नचिन्ह उभा होता. शाळा सुरु करण्याबाबत पालिकेची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेणार नाहीत.

दक्षिण आफ्रिकेहून पुण्यात आलेल्यांपैकी एक जण Covid पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. हा व्हेरिएंट खूपच घातक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्वच देशांनी खबरदारीच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भात आवश्यक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र सरकारही अलर्ट झाले असून त्यांनीही योग्य ती पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याच दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी पुण्यातून समोर आली आहे. आफ्रिकेहून आलेल्या एका पुणेकराचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील चौघेजण हे परदेशात फिरायला गेले होते आणि त्यापैकी एका व्यक्तीचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune, Pune school