पुणे, 16 ऑक्टोंबर : मागच्या काही काळात पुण्यात गुंड प्रवृत्ती फोफावत चालली होती. खून मारामाऱ्या अशा अनेक गुन्ह्यांच्या प्रमाणात पुण्यात वाढ झाली होती. यामुळे पुणे पोलिसांना एकप्रकारे आव्हानच निर्माण झाले होते. दरम्यान पुण्यात अल्पावधित आपल्या कुकृत्यांमुळे मोठा झालेल्या गज्या मारणेला पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. मारणेने मागच्या काही काळात एवढी दहशत केली होती त्यामुळे पुणे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान पुणे पोलिसांनी मारणेच्या मुसक्या आवळल्या त्याचबरोबर त्याचा साथीदार मयूर राजेंद्र निवंगुणेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गज्या मारणेसह साथीदार मयूर याने एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या कारणावरून पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी दिली होती. त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर थेट मोक्काची कारवाई करण्यात आली होती. परंतु यातील काही आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा तपास करत होते.
हे ही वाचा : वाचवा…वाचवा… वाचवा… पुणेकर तरुणाची बसमध्ये बोंबाबोंब; त्याच्यासोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO
त्यातील एका मोठ्या गुंडाला पुणे पोलीसांनी सापळा रचत नवले ब्रीज येथून अटक केली आहे. मयूर राजेंद्र निवंगुणे असे 24 वर्षीय गुंडाचे नाव आहे. तो नर्हे येथील वसंत प्लाझामध्ये राहतो. 7 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या अपहारनातील हा सहावा आरोपी असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
मागच्या तीन वर्षांपासून खून, खंडणीच्या प्रकणात दहशत माजवणाऱ्या गज्या मारणेसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पुण्यात गुंड प्रवृत्तीला खत पाणी घालणाऱ्या कुख्यात गुंड गज्या मारणेला आणि त्याच्या टोळीला पुणे पोलीसांनी चांगलेच रडारवर घेतले आहे.
गज्या मारणेने मागच्या दिड वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हजारोंच्या संख्येने दोन चाकी रॅली काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मारणेने पुणे पोलीसांना एकप्रकारे आवाहनच दिले होते, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून पुणे पोलीसांनी शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता.
हे ही वाचा : तरूणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारं सेक्स्टॉर्शन असतं काय? पुण्यात घडले हजारो प्रकार
मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी कुख्यात गुंड गज्या मारणे याने दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला आणि गज्या मारणेसह पप्पु घोलप, अमर किर्दत, रुपेश मारणे, सांगलीचा हेमंत पाटील अशा १४ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील चौघांना अटक केली आहे. चंदगडचा डॉ.प्रकाश बांदिवडेकर याचा सहभाग आढळल्याने त्यालाही इंदूरहून अटक केली. असून मयुर राजेंद्र निवंगुणे हा सहावा आरोपी आहे.