जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune News: दिल्लीतील इंजिनिअर लोणावळ्यातील जंगलात बेपत्ता, चार दिवसांनी आढळला मृतदेह

Pune News: दिल्लीतील इंजिनिअर लोणावळ्यातील जंगलात बेपत्ता, चार दिवसांनी आढळला मृतदेह

दिल्लीतील इंजिनिअरचा मृतदेह आढळला; गेल्या चार दिवसांपासून लोणावळ्यातील जंगलात झाला होता बेपत्ता

दिल्लीतील इंजिनिअरचा मृतदेह आढळला; गेल्या चार दिवसांपासून लोणावळ्यातील जंगलात झाला होता बेपत्ता

दिल्लीतील इंजिनिअर लोणावळ्याच्या जंगलात बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ, लोणावळा ग्रामीण पोलीस,मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक कार्यरत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

गणेश दुडम, प्रतिनिधी लोणावळा, 24 मे : दिल्लीतील एक अभियंता शुक्रवारी (20 मे 2022) लोणावळ्याच्या जंगलात (Lonavala Forest) हरवला होता. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. फरहान शहा (Farhan Shah) असं त्याचं नाव आहे. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ, लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक कार्यरत होते. आज शोधमोहिमे दरम्यान फरहान शहा याचा मृतदेह आढळून आला आहे. (Delhi engineer found dead in Lonavala Khandala Forest, he was missing from 20th May) लोणावळा आणि खंडाळाच्या घनदाट झाडीत हरविलेल्या अभियंत्याचा शोध घेण्यासाठी NDRF चं पथक पोहचलेलं. तत्पूर्वीच आज सकाळी आयएनएस शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास आला होता. त्याच दिशेने NDRF चे जवान दरीत उतरले. तिथं फरहाणच्या टी शर्ट आढळला. फरहान याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. फरहानच्या शोधासाठी आज श्वान पथक ही दाखल झालं होतं. वाचा :  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज येथे सहलीला गेलेला दिल्लीस्थित पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलात बेपत्ता झाला होता. नागफणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेने आला हेच विसरून गेला होता. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली. या तरुणाला शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तसंच, कुटुंबीयांनीही 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ‘मला शोधायला कोणाला तरी पाठवा’ फरहान हा 20 मे रोजी हरवला होता आणि तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. वाट चुकल्यामुळे फरहान कुटुंबीय आणि मित्रांना याबाबत कळवत होता. दुपारी अडीच वाजता त्याचा शेवटचा संपर्क झाला, तेव्हा पुढच्या तीन-चार तासात ‘माझा संपर्क न झाल्यास मला शोधायला कोणाला तरी पाठवा’ असं तो म्हणाला होता. त्यानंतर मोबाईलची बॅटरी लो झाली अन् तो संपर्कक्षेत्राबाहेर गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात