पुणे, 17 नोव्हेंबर : पुण्यातील कोथरुड भागात मोठी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. कोथरुडमधल्या श्रावणधारा इमारतीतील सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही आग गॅस सिलींडरचा स्फोट झाल्याने लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत ताबडतोब अग्निशमन दलाच्या विभागास माहिती कळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अवघ्या काही मिनीटातच आगीचे लोट बाहेर येत होते.
पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा सोसायटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील काही फ्लॅट्सना आग लागली आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागलेल्या फ्लॅट्समधील आठ ते दहा लोकांना खाली आणण्यात आलं आहे.
हे ही वाचा : सातारा : पत्नी-मुलगा मोबाईलवर असताना पतीने केला टीव्ही बंद, यानंतर घडलं भयानक
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोथरुडमधील आशिष गार्डनजवळ ही सोसायटी आहे.
कोथरुडमध्ये एकाच दिवशी दोन घटना
गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोसायटीतील आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केली. हि घटना कोथरुड येथे घडली.
हे ही वाचा : गळफास लागून मृत्यू, पोस्टमॉर्टमनंतर समोर आलं कांड, बीडच्या घटनेने खळबळ
कोथरूड येथील पौड रस्त्यावर असणाऱ्या आनंदनगर भागात प्रभा को ऑप सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये गुरवारी पहाटे पावणे पाच वाजता आग लागल्याची खबर अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gas, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune fire