मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune: सेल्फी घ्यायला गेला आणि बंधाऱ्यात पडला; मित्रांच्या डोळ्यासमोर पुण्यातील तरुण बुडाला

Pune: सेल्फी घ्यायला गेला आणि बंधाऱ्यात पडला; मित्रांच्या डोळ्यासमोर पुण्यातील तरुण बुडाला

सेल्फी घ्यायला गेला आणि बंधाऱ्यात पडला अन् मित्रांच्या डोळ्यासमोर पुण्यातील तरुण बुडाला

सेल्फी घ्यायला गेला आणि बंधाऱ्यात पडला अन् मित्रांच्या डोळ्यासमोर पुण्यातील तरुण बुडाला

Pune News: सेल्फी घेताना पुण्यातील बंधाऱ्यात पडून एका कॉलेजच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 27 तासांनंतर या तरुणाचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला आहे.

गणेश दुडम, प्रतिनिधी

मावळ, 17 एप्रिल : सेल्फीच्या नादात आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचं आपण ऐकलं किंवा वाचलं असेलच. मात्र, असे असतानाही अद्यापही तरुण सेल्फी (Selfie) क्लिक करताना काळजी घेत नाहीत आणि त्यामुळे अपघात होण्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. आता अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval Pune) येथे घडली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण बंधाऱ्यात पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

इंदिरा कॉलेज ताथवडे (Indira Collage Tathavade) च्या सहा विद्यार्थ्यांची सहल मावळातील कुंडमळा परिसरात काल गेली होती. त्यापैकी आनंद मिश्रा या विद्यार्थ्याला सेल्फीचा मोह आवरला नाही आणि त्याने अत्यंत धोकादायक पद्धतीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेल्फी घेताना पाय घसरून आनंद मिश्रा पाण्याच्या डोहात पडला आणि खोल रांजण खळग्यात वाहून गेला.

वाचा : भाजप-मनसे मिळून शिवसेनेला घेरणार; महाराष्ट्र दिनी फडणवीसांची मुंबईत सभा तर औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार

यावेळी मित्रांनी त्याला तसं धाडस करू नको म्हणून अनेकदा विनवले होते मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. आता हेच धाडस आनंद मिश्रा या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आणि त्याला अखेर आपला प्राण गमवावा लागला.

आनंद मिश्रा पाण्यात पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मावळ वन्य जीव रक्षक आणि सुदुंबरे एनडीआरएफ टीम दाखल झाली. कालपासून या मुलाचा शोध घेण्यात येत होता. अखेर 27 तासांनी आनंद मिश्रा याचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती लागला आहे.

वाचा : 'चलो अयोध्या' राज ठाकरेंनी तारखेसह केली मोठी घोषणा

हिटरचा धक्का लागल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील एका 13 वर्षीय मुलाचा हिटरच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रणव मुकुंदा पाटील (वय-13) असं मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. मुकूंदा दामू पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

रविवार रोजी मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील हे दोघेजण भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता. दुपारच्या  सुमारास बाथरूममध्ये बादलीत हिटर लावले होते. त्यानंतर बाजूलाच प्रणव अंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला विद्यूत हिटरचा धक्का लागल्याने प्रणवचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, लग्नात आलेले रवींद्र पाटील हे घरी आले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले.

First published:

Tags: Pimpri chinchawad, Pune, Selfie