जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून बाईकस्वारांना हेल्मेट वापरावा लागणार, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून बाईकस्वारांना हेल्मेट वापरावा लागणार, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून बाईकस्वारांना हेल्मेट वापरावा लागणार, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 31 मार्च : पुण्यात हेल्मेट (Helmet) सक्तीचा निर्णय यापूर्वी लागू करण्यात आला होता आणि हा निर्णय वादातही सापडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्वाचा आदेश काढला आहे. शासकीय कार्यालयात येताना दुचाकी वाहन चालविणाऱ्यांनी हेल्मेट (use of helmet while driving two wheeler) वापरण्याच्या संदर्भात हे आदेश आहेत. मात्र, हे आदेश म्हणजे हेल्मेट सक्ती नाही नसून हेल्मेट वापरण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची न्यूज18 लोकमतला दिली आहे. पुण्यातील (Pune) शासकीय कार्यालयात उद्यापासून सरसकट हेल्मेटसक्तीचे आदेश निघाल्याने काहिसे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. पण स्वत: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीच न्यूज18लोकमतशा बोलताना यासंबंधीचा खुलासा केला आहे. परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार हे आदेश निघाले असून पहिल्या टप्प्यात प्रबोधन केलं जाईल, असंही पुणे आरटीओ अजित शिंदे यांनी म्हटलं आहे. वाचा :  एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम संपला, संपकरी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय काय म्हटलं होतं परिपत्रकात? वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे 80 टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालाकंच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके दुचाकी वाहन चालक रस्ते अपघातात दगावतात, त्यापैकी सुमारे 62 टक्के व्यक्तींना डोक्याला इजा झाल्याने मृत्यू ओढवतो. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार, भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार, 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. याद्वारे पुणे जिल््हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यलये, शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या, दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की, शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्यकर्तव्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात