मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुणे : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीच्या डोक्यातच सिलेंडरने मारलं, धक्कादायक प्रकार

पुणे : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीच्या डोक्यातच सिलेंडरने मारलं, धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

गॅस सिलेंडर डोक्‍यात तीनवेळा घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पुणे, 1 एप्रिल : पती-पत्नीमधील भांडण हे काही नवीन नाही. मात्र पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad News) शहरात एका नराधम पतीने पत्नी दारू पिण्यास विरोध करते. तसेच दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून घरगुती वापराचा गॅस सिलेंडर डोक्‍यात तीनवेळा घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही धक्‍कादायक घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडली. मीना नितिन वकटे असे पतीने केलेल्या खूनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून तिने याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन आयलाजी वकटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना या घरी असताना आरोपी पतीला त्यांनी दारू पिण्यास विरोध केला. तसेच दारू पिण्यासाठी पतीला पैसेही दिले नाहीत. या कारणावरून संतापलेल्या आरोपी नितीन याने त्याची पत्नी मीना यांच्या डोक्‍यात तीनवेळा गॅस सिलेंडर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पोलीस कर्मचारी असलेल्या पती आणि त्याच्या पोलीस मैत्रीणीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. कायद्याच्या रक्षकांकडूनही पत्नीला अशी क्रुर वागणूक मिळाल्याने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शहरात दररोज सरासरी दोन विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत.

हे ही वाचा-कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे; अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबादेतील थरकाप उडवणारी घटना

तर खूनी हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आह. 2020 मध्ये 66 खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली. तर 2021 मध्ये तब्बल दुप्पट म्हणजे 122 खूनी हल्ल्यांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर यंदाच्या वर्षी 2022 मध्ये पहिल्या दोन महिन्यांमध्य 10 खूनी हल्ल्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. वाढती गुन्ह्यांची आकडेवारी पाहता पिंपरी चिंचवड शहराची क्राईम सिटीकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येते.

First published:

Tags: Pimpari chinchavad, Pune