Live Updates : गिरगावच्या गोविंदाला खांद्यावर गंभीर दुखापत, केईएम रूग्णालयामध्ये होणार शस्त्रक्रिया

माता गोविंदा पथकाचे 40 ते 45 गोविंदा ट्रकमध्ये उभे राहून दहीहंडी फोडण्यासाठी भिवंडी शहरात येत होते

 • News18 Lokmat
 • | August 19, 2022, 23:59 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:58 (IST)

  उपमुख्यमंत्री सिसोदियांच्या घरावर सीबीआयचा छापा
  दिल्लीत 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर सीबीआयचे छापे
  मनीष सिसोदियांच्या निवासस्थानची शोधमोहीम पूर्ण
  काही पुरावे, इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन CBI रवाना

  22:27 (IST)

  मागाठण्यात आमदार प्रकाश सुर्वे आयोजित दहीहंडी
  कृष्णाई मंडळाला मानाची हंडी फोडण्याचा मान
  देवीपाडाच्या कृष्णाई पथकाकडून 5 थरांची सलामी

  21:48 (IST)

  मुंबईत 111 गोविंदा जखमी झाल्याची माहिती
  88 जखमी गोविंदांना उपचारांनंतर डिस्चार्ज
  23 गोविंदांवर उपचार, सर्वांची प्रकृती स्थिर

  21:48 (IST)

  कोल्हापूर - खासदार धनंजय महाडिकांची दहीहंडी
  पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहीहंडी
  संघर्ष गोविंदा पथकानं युवाशक्तीची हंडी फोडली

  20:18 (IST)

  भिवंडीत कपिल पाटील यांचा दहीहंडी उत्सव
  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाढवला उत्साह

  20:13 (IST)

  'इथून पुढे महाभारत होणार, वाईटाचा नाश होणार'
  धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

  19:34 (IST)

  प्रवीण दरेकरांची दहिसरमधील दहीहंडी
  शिवराज प्रतिष्ठानचा लोकरंग उत्सव
  शिंदे, फडणवीस आणि शेलारांची उपस्थिती

  19:27 (IST)

  वरळी-जांबोरी मैदानावरच्या दहीहंडीतील घटना
  थर रचताना 6व्या थरावरून गोविंदा कोसळला
  22 वर्षांच्या गोविंदावर केईएममध्ये उपचार

  19:24 (IST)

  कोल्हापूर - दसरा चौकात दहीहंडीचा थरार सुरू
  खासदार धनंजय महाडिकांची 3 लाखांची दहीहंडी
  कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील गोविंदा कोल्हापुरात

  18:58 (IST)

  मुंबईत 78 गोविंदा जखमी झाल्याची माहिती
  67 जखमी गोविंदांना उपचारांनंतर डिस्चार्ज
  विविध रुग्णालयांमध्ये 11 गोविंदांवर उपचार

  Live Update: सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. मात्र, भिवंडीमधून एक दुर्घटना समोर आली आहे. यात दहीहंडी फोडण्यासाठी भिवंडी शहरात येत असताना वसई रोडवरील कालवार येथे खड्ड्यामुळे गोविंदांच्या ट्रकचा अपघात झाला. दुभाजकावर ट्रकची  धडक बसल्याने ट्रक पलटी झाला असून त्यामध्ये सहा गोविंदा जखमी झाले आहेत.