Home /News /maharashtra /

बारामतीतल्या कुप्रसिद्ध गुंड्याचा गुन्हेगारी हैदोस, मुलाचे अपहरण करुन दिली जीवे मारण्याची धमकी, नंतर महिलेसोबत केलं विकृत कृत्य

बारामतीतल्या कुप्रसिद्ध गुंड्याचा गुन्हेगारी हैदोस, मुलाचे अपहरण करुन दिली जीवे मारण्याची धमकी, नंतर महिलेसोबत केलं विकृत कृत्य

महिलेला कुणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून नराधमाने महिलेला मोरगाव रोडच्या सिकंदर नगर भागात बोलाविले.

    पुणे, 7 जून : राज्यात अत्याचाराच्या, बलात्काराच्या (Physical Abused) घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिकवणी संपल्यानंतर रिक्षाने घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची पुण्यात घडली. ही घटना ताजी असतानाचा पुणे (Pune) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काय आहे घटना - बारामती शहर पोलीस (Baramati City Police Station) ठाण्याच्या अभिलेखावरील कुप्रसिद्ध गुंड रोहित केशव जगताप याने बारामती मधील महिलेसोबत केलेल्या कृत्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. तसेच तिला मारुन टाकण्याची धमकीही (Threatening) देण्यात आली. यानंतर तिला कुणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून तसेच स्वतःची असणारी दहशत या जोरावर नामचीने गुंडाने महिलेसोबत धक्कादायक प्रकार केला. महिलेला कुणी जवळचे नातेवाईक नाही, हे पाहून नराधमाने महिलेला मोरगाव रोडच्या सिकंदर नगर (Sikandar Nagar Baramati) भागात बोलाविले. तसेच याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये तिच्यावर काल दुपारी 12 वाजता लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही. तर सदर पीडिता ज्याठिकाणी काम करत होती, त्याठिकाणी येऊन त्याने पुन्हा गोंधळ केला. इतकेच नव्हे तर पुन्हा शारीरिक सुखाची मागणी या महिलेकडे केली. तिने त्याच्या मागणीला नकार दिला असता आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड केली. अखेर या महिलेने कोणतीही तमा न बाळगता पोलीस ठाण्यात गाठून बलात्कार संदर्भातील हकीकत पोलिसांना सांगितली. हेही वाचा - Pune Crime : रिक्षाचालकाकडून 17 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच आरोपीने घेतला मुलीच्या गळ्याचा चावा, पुण्यातील धक्कादायक घटना यानंतर पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवला. तसेच आरोपीला अटक केली. रोहित केशव जगताप (वय 28), असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भादवि कलम 376, 427, 506, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापुढे कोणत्याही महिलेची कुणाविरुद्धही लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात संपर्क करावा, नराधमाविरोधात तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Baramati, Crime news, Pune, Sexual harassment

    पुढील बातम्या