पिंपरी, 04 डिसेंबर: पिंपरी नजीक असणाऱ्या थेरगाव याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका मालकाला दुकानात काम करणाऱ्या कामगाराला कामाचे आगाऊ पैसे न देणं चांगलंच महागात पडलं आहे. दुकानात कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार दिल्याच्या (refused to give money for extra work) कारणातून संबंधित कामगाराने रागाच्या भरात थेट दुकान पेटवून दिलं (worker set fire to shop) आहे.
धक्कादायक घटनेच दुकानाचं प्रचंड नुकसान झालं असून आसपासच्या दुकानाचं देखील नुकसान झालं आहे. या प्रकरणी दुकान मालकाने कामगाराविरोधात फिर्याद दाखल केली असून आरोपी कामगाराला वाकड पोलिसांनी अटक (Accused arrested) केली आहे.
प्रकाश शंकरराव सोनकांबळे असं अटक केलेल्या आरोपी कामगाराचं नाव असून तो भालकी जिल्ह्याच्या बिदर येथील रहिवासी आहे. शंकर लक्ष्मण सोनवणे असं दुकान मालकाचं नाव असून थेरगावातील दत्तनगर येथे ओमसाई कुशन नावाचं त्यांचं दुकान आहे. आरोपी सोनकांबळे हा याच दुकानात कामगार होता. आरोपी प्रकाश याने दुकानात काम केल्याचे आगाऊ पैसे मालक सोनवणे यांच्याकडे मागितले. पण मालकाने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन कामगाराने मालकाला शिवीगाळही केली.
हेही वाचा-पुण्यात 'अंडरवेअर गँग'चा धुमाकूळ, मोबाइल चोरीसाठी खास अंडरवेअरचा वापर
मालकाविषयीचा राग मनात धरून आरोपी प्रकाश याने संधी मिळतात थेट दुकानाला आग लावली आहे. काही कळायच्या आत आरोपीनं आग लावल्याने दुकानाच मोठं नुकसान झालं आहे. तसेच या आगीमुळे बाजूच्या अन्य दुकानांचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कामगाराच्या या कृत्यामुळे दुकानाचं मोठं नुकसान झालं असून त्याचा फटका अन्य दुकानांही देखील बसला आहे.
हेही वाचा-फेसबुकवरील मित्रानं केला घात, आधी रेप केला मग पीडितेच्या वडिलांकडे मागितले 10लाख
हा प्रकार घडल्यानंतर, दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनवणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी कामगाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी कामगाराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pimpri chinchavad