जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nude Photography मुळे पुण्यात नवा वाद; प्रदर्शन बंद करण्याचे आदेश, माझ्याच फोटोंच्या प्रदर्शनावर बंदी का? तरुणाचा सवाल

Nude Photography मुळे पुण्यात नवा वाद; प्रदर्शन बंद करण्याचे आदेश, माझ्याच फोटोंच्या प्रदर्शनावर बंदी का? तरुणाचा सवाल

Nude Photography मुळे पुण्यात नवा वाद; प्रदर्शन बंद करण्याचे आदेश, वाचा काय आहे प्रकरण?

Nude Photography मुळे पुण्यात नवा वाद; प्रदर्शन बंद करण्याचे आदेश, वाचा काय आहे प्रकरण?

nude photography exhibition in pune now arise new controversy: पुण्यात नग्न फोटोंच्या प्रदर्शनामुळे नवा वाद उभा राहिला आहे. या प्रदर्शनावर आता बंदीचे आदेश दिले जात आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 9 जानेवारी : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक नव तरुण कलाकार त्याच्या नग्न फोटोंच प्रदर्शन (Nude Photography exhibition) भरवतो आणि कुणाला काही कळायच्या आत त्याला प्रदर्शन बंद करण्याचे आदेश दिले जातात. पुण्यातील (Pune) मुक्त कलादालन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालग्नधर्व आर्ट गॅलरीमध्ये हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणाने आपल्या नग्न फोटोंच प्रदर्शन भरवलं होतं त्यासाठी त्याने रितसर परवानगीही घेतली होती. मूळचा सातारा येथील असलेल्या अक्षय माळी (Akshay Mali) नावाच्या 23 वर्षीय तरुणाने त्याने काढलेल्या स्वतःच्या आणि दोन महिला मॉडेल्सच्या नग्न फोटोंच प्रदर्शन बालग्नधर्व कला दालनात भरवलं. या प्रदर्शनात त्याने अतिशय कलात्मक पद्धतीन काढलेले अनेक नग्न फोटो बघण्यासाठी लावले होते.आपल्या शुक्राणू, रक्त ,आणि महिलांच्या मासिक पाळीत येणार रक्ताचा समावेश असलेलं एक कॅनव्हास पेंटिंगचाही त्याचा चित्रप्रदर्शनात समावेश आहे. त्याच बरोबर टॉयलेट सीटमध्ये डोकं खुपसून उलटा उभा असलेला आपला फोटोही अक्षयने या प्रदर्शनात ठेवलेला. या फोटो बद्दल अक्षय सांगतो की, भारतात अनेक लोकं नरका पेक्षाही अत्यंत वाईट परिस्थिती राहतात किंवा संभोग करतांना मुख मैथुनसारख्या अनेक ओंगळवण्या क्रिया करतात त्यावेळी कुणाला वाईट वाटत नाही किंवा आता प्रत्येक मुलांच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये पोर्नोग्राफी असते तिथं कसे आणि कोण निर्बंध घालणार? मग माझ्याच फोटोंच्या प्रदर्शनावर बंदी का ?असा प्रश्न त्याने विचारलाय. वाचा :  पॉर्न VIDEO दाखवून विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR दाखल तर त्याच्या ह्या प्रदर्शनासाठी स्वतःच्या देहाचे नग्न फोटो काढण्यासाठी परवानगी देणाऱ्या “मॅडम स्त्री” #madam stree नावाची मॉडेल म्हणाली की, मी खूप जाड आहे पण म्हणून मी माझ्या शरीरावर प्रेम करणं सोडायचं? मी nude art कडे वळले त्याच्या मागे असलेलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला माझ्या शरीराशी असलेलं नातं सबळ करायचं होतं. आपल्याला सगळ्यांना आपल्या शरीराची किंवा कुठल्या न कुठल्या अवयवाची लाज वाटत असते. कोणाला वाटत माझे हातचं जाड आहेत, कोणाला वाटत माझी उंचीच कमी आहे आणि हा न्यूनगंड आपल्याला आपल्या शरीरापासून दूर लोटतो. जे शरीर आपल्यासाठी इतकं करत आपण त्या शरीराला दोष देतो. नाव ठेवतो. अंघोळ करताना सुद्धा आरशात बघण टाळतो. हेच माझ्या शरीराशी असलेलं नातं मला सुधारायच होत. माझं शरीर जसं आहे ते सुंदर आहे म्हणून मी न्यूड आर्टच्या मार्गाने ते सेलिब्रेट करायचं ठरवलं. वाचा :  Pune: पैलवान नागेश कराळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली समोर मग इंस्टाग्रामवर अक्षयसोबत, त्याचे फोटो बोलके होते. निसर्गाशी एकरूप झालेला माणूस. कल्पनाच किती सुंदर आहे ना. जसं झाड नग्न आहे म्हणून त्याला कोणी कपडे घालायला जात नाही किंवा किंवा रानात चरणाऱ्या गुरांना कोणी अश्लील म्हणत नाही. मग हे नियम माणसालाच का ? त्याचे फोटो मला हा प्रश्न विचारत होते. लाज लाज बाळगताना वाऱ्याची मंद झुळूक शरीराला स्पर्श करते तेव्हा काय वाटतं हे आपल्याला माहीतच नसतं. एखाद्या शरीराकडे केवळ शरीर म्हणून कसं बघावं? वासना बघण्याच्या नजरेत आहे शरीर तर निसर्गाचा एक भाग आहे. हे समजून घ्यायला हवं असंही मॅडम स्त्री यानी म्हटलं. एकूणच या कलाकारांचं मत होतं की बालग्नधर्व व्यवस्थापनाने त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणलीय. मात्र बालग्नधर्वचे व्यवस्थापक सुनील मते यांनी कलाकारांचे आरोप फेटाळत, लोकभावना दुखावल्या जाऊ नये म्हणून आपण प्रदर्शनाला बंद करायला सांगितल्याच म्हटलंय, त्याचबरोबर वरिष्ठंनी परवानगी दिल्यास आपली हरकत नसल्याचंही मते म्हणाले. असं असलं तरीही प्रख्यात चित्रकार सुनील शेगावकर आणि ख्यातनाम फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांनी बालग्नधर्व व्यवस्थापनाच्या कृतीचा तीव्र निषेध करत अक्षय माळीने काढलेल्या फोटोंची स्तुती केलीय आणि त्याच्या केलेला पाठींबाही दर्शविलाय. वाचा :  ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं; पुण्यात गुणवान बॅडमिंटनपटू तरुणीचा दुर्दैवी अंत देवदत्त कशाळीकर म्हणाले, प्रदर्शन बंद करायचं होतं तर आधी परवानगी द्यायची नव्हती, प्रदर्शन बंद करून व्यवस्थापणाने कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा अपमान केलाय. अर्थातच पुणे किंवा पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये कोणत्या कलेचं प्रदर्शन भरवलं जावं याचं परीक्षण करणार एकही समिती नसल्याने असे अपमान वारंवार होत राहतात आणि ज्यांना कलेच्या बाबतीत काहीही कळत नाही ते प्रदर्शना भरवने किंवा बंद करण्याबाबत परवनगी कशी देऊ शकतात हाच मुळात प्रश्न आहे. तर चित्रकार सुनील शेगावकर यांनीही बालग्नधर्व प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करत भारतीय प्राचिन संस्कृतीतील खजुराव येथेही कलेची आठवण करून दिली. तिथे नग्नशिल्प कलेला मान्यता देणारे आपलेच पूर्वज होते आणि माणसाचा मूळ स्वभावात नग्नतेकडे जाणारा असतो त्याच स्वभावाला कलाकार अक्षयने आपल्या केलेतून सादर करण्याचा प्रयत्न केला त्यात काही गैर नाही असं म्हणत शेगावकर यांनी अक्षयला पाठींबा दर्शविला आहे. आता या सगळ्या प्रकरणाने अक्षय माळी याचं प्रदर्शन सुरू ठेवायचं की नाही? या बाबत पुणे महानगरपलिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात