मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

80 वर्षांच्या सासऱ्याने केला 55 वर्षांच्या सुनेचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक प्रकार

80 वर्षांच्या सासऱ्याने केला 55 वर्षांच्या सुनेचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक प्रकार

फौजदारी व कौटुंबिक न्यायालयात केसेस सुरू आहेत. मात्र, या केसेस सुरू असतानाच सासरी आलेल्या 55 वर्षांच्या सुनेचा 80 वर्षांच्या सासऱ्याने विनयभंग केला.

    पुणे, 16 जुलै : पुण्यात चारित्र्याच्या संयशावरुन आपल्याच प्रेयसीची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा खुलासा पाच दिवसांपूर्वी झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका पुण्यात 55 वर्षांच्या सुनेचा 80 वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग झाला आहे. यानतंर पोलिसांनी 80 वर्षांच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. काय आहे प्रकरण - फौजदारी व कौटुंबिक न्यायालयात केसेस सुरू आहेत. मात्र, या केसेस सुरू असतानाच सासरी आलेल्या 55 वर्षांच्या सुनेचा 80 वर्षांच्या सासऱ्याने विनयभंग केला. ही धक्कादायक घटना प्रभात रोडवरील बंगल्यात शुक्रवारी घडली. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या 55 वर्षांच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी 80 वर्षाच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे सासर प्रभात रोडला आहे. त्या पतीपासून काही वर्षांपासून वेगळ्या पिंपळे सौदागर येथे राहतात. त्यांच्यात फौजदारी न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात ३ केसेस सुरू आहेत. त्यामुळे त्या शुक्रवारी दुपारी सासरी नांदण्यास व राहण्यासाठी जाण्यासाठी आणि पोटगी घेण्यासाठी आल्या होत्या. याचदरम्यान, त्यांच्या 80 वर्षांच्या सासऱ्याने त्यांना अडवले आणि अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला. हेही वाचा - पुण्यातील बेरोजगार तरुणाची आत्महत्या; 'प्लेसमेंट होणार नाही', या भीतीने उचलले टोकाचे पाऊल याप्रकरणी फिर्यादी महिलेने डेक्कन पोलीस तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune crime news

    पुढील बातम्या