पिंपरी, 15 जुलै : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना पाहायला मिळत आहेत. अनेक जण वैयक्तिक कारणातून आणि इतरही अन्य कारणातून आत्महत्या करत आहे. यातच आता पुण्यात एका इजिनिअरिंगच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (वय 21 , रा. माउंट युनिक सोसायटी, ऑडी शोरूम पाठीमागे, सुसगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाने नाव आहे. काय आहे संपूर्ण घटना - इंजिनिअरिंग झालेल्या एका तरुणाने‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने आत्महत्या केली. ही घटना सुसगाव येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाने इजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याने नोकरीसाठी ‘प्लेसमेंट’ मिळणार नाही, या भीतीने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये मृत्यूचे कारण - दरम्यान, घटनेचे माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्याने त्याला प्लेसमेंट होणार नाही, या भीतीने सुसाईड केले असल्याचे नमूद केले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. तीन दिवसांपूर्वीही पुण्यात आत्महत्येची घटना घडली - तर तीन दिवसांपूर्वी आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने (Daughter In Law) आत्महत्या (suicide) केली. सुनेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आळंदी (suicide in alandi) नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे (Alandi Nagar Parishad), त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. (bjp) दरम्यान तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.