Home /News /maharashtra /

सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड; सांगलीतील हसत्या-खेळत्या कुटुंबातील 9 जणांना एका क्षणात संपवलं 

सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड; सांगलीतील हसत्या-खेळत्या कुटुंबातील 9 जणांना एका क्षणात संपवलं 

त्या दिवशी एकाच घरात आढळले होते 9 मृतदेह, हादरवणारा दिवस...

    सांगली, 27 जून : सांगलीतील (Sangali Mass suicide) म्हैसाळ येथून काही दिवसांपूर्वी एक वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. तोपर्यंत ही सामूहिक आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबांची सामूहिक आत्महत्या नसून हे हत्याकांड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही भोंदू बाबा असल्याचं समोर आलं आहे. या दोघांनीच विषारी औषध देऊन हसत्या-खेळत्या कुटुंबाचा घास घेतला. या प्रकरणात गुप्त धन, तंत्र-मंत्र आदी पैलूही समोर आले आहेत. कुटुंबातील मृतांमधील दोघांची अनोळखी व्यक्ती सोबत गुप्त धनाबाबत भेट होत असल्याचं आणि समोरच्या व्यक्तीस पैसे दिल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट) यांना सोलापूरातून अटक केली आहे. डॉक्टर माणिक वनमोरे यांच्यावर प्रचंड कर्ज असल्याने आर्थिक विवंचनेतून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू होती. त्यामुळे आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात या 9 जणांची हत्या करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. आरोपींनी ही हत्या का केली, याबाबत चौकशी सुरू आहे. मात्र गुप्त धनाच्या हव्यासापोटी हत्याकांड केल्याचा संशय आहे. घरात आढळले होते 9 मृतदेह पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेलजवळ तर दुसरीकडे घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे , मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang murder, Sangali

    पुढील बातम्या