मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्याजवळच्या 'मर्सिडीझ बेंझ' मध्ये अवतरला बिबट्या; 6 तासांच्या थरारानंतर सुटका

पुण्याजवळच्या 'मर्सिडीझ बेंझ' मध्ये अवतरला बिबट्या; 6 तासांच्या थरारानंतर सुटका

पहाटे पहाटे बिबट्या चक्क मर्सिडीज बेंझच्या शॉप फ्लोअरवरच दिसला. नंतर काय झालं वाचा..

पहाटे पहाटे बिबट्या चक्क मर्सिडीज बेंझच्या शॉप फ्लोअरवरच दिसला. नंतर काय झालं वाचा..

पहाटे पहाटे बिबट्या चक्क मर्सिडीज बेंझच्या शॉप फ्लोअरवरच दिसला. नंतर काय झालं वाचा..

  पुणे, 21 मार्च: अलीकडे शहरात वन्य प्राणी येण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात अलीकडच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातही गवा, रानरेडा असे प्राणी आल्याच्या घटना ताज्या आहेत. वस्तीत शिरलेल्या वन्य प्राण्यांना सुखरूप त्यांच्या अधिवासात सोडणं हे मोठं आव्हान असतं. अशीच एक आव्हानात्मक कामगिरी पुणे वन विभागानं नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली आहे. या वेळी बिबट्याने चक्क मर्सिडीज बेंझ निवडली. या बड्या कार कंपनीच्या चाकणच्या शॉप फ्लोअरवरच तो पहाटे दिसला. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर वन विभागाने आज (सोमवार, 21 मार्च) चाकणमधल्या (Chakan mercedes Benz) मर्सिडीज-बेंझ इंडिया (Mercedes Benz Pune) कंपनीच्या आवारात शिरलेल्या बिबट्याची (Leopard rescue Pune) सुखरूप सुटका केली.

  वन विभागाचे (Forest Department) कर्मचारी आणि वन्यजीव बचाव तज्ज्ञांनी (Wildlife rescue experts) स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही मोहीम फत्ते केली आहे. 'इंडियन एक्सप्रेस'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शॉप फ्लोअरवर बिबट्या दिसताच कर्मचारी आणि कामगार वर्गाला प्रथम सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्यामुळे बिबट्याला पकडण्याच्या झटापटीत कुणी जखमी झालं नाही.

  हृदयस्पर्शी! मध्यरात्री रस्त्यावर धावत होता तरुण; लिफ्ट घेण्यासही नकार, कारण जाणून पाणावतील डोळे, VIDEO

  याबाबत अधिक माहिती देताना म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरविंद पवार म्हणाले, की वन अधिकारी आणि स्वयंसेवकांनी ट्रँक्विलायझर डार्टचा वापर करून सकाळी 11.30 च्या सुमारास मर्सिडीज-बेंझ इंडिया कंपनीच्या आवारात शिरलेल्या या बिबट्याची सुटका केली. त्याला आता जुन्नरमधल्या, प्राण्यांसाठी असलेल्या ट्रान्झिट सुविधेत नेण्यात येणार आहे. बिबट्या निवारा केंद्रात नेल्यानंतर तिथून त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.  वेळीज खबरदारी घेतल्याने या मोहिमेत कोणालाही दुखापत झाली नाही, असंही पवार यांनी सांगितलं.

  'कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे 5वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या शॉप फ्लोअरवर (Shop Floor) बिबट्या दिसल्याचा फोन केला. सर्वांत प्रथम आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणापासून दूर जाण्यास सांगितलं. त्यानंतर आम्ही वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव बचाव कार्यकर्ते, स्वयंसेवक यांना पाचारण केलं. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूचा मोठा परिसर रिकामा करण्यात आला आणि पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं,' अशी माहिती पवार यांनी दिली.

  'कंपनीच्या लगतच्या वनक्षेत्रातून हा बिबट्या कंपनीच्या आवारात आला असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला. वन विभागाचे अधिकारी, वन्य जीव बचाव कार्यकर्ते आणि पोलीस यांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला पकडलं, तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कंपनीच्या शॉप फ्लोअरवर बिबट्या आहे असं निर्दशनास येताच तिथले कर्मचारी, अधिकारी यांच्यात एकच खळबळ उडाली होती; मात्र सुदैवाने कोणालाही काहीही दुखापत न होता अगदी सुखरूपपणे ही मोहीम यशस्वी झाली.

  First published:
  top videos

   Tags: Leopard, Pune, Rescue operation