जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धडक दिली अन् दुचाकीला नेलं कारने फरफटत, महामार्गावर उडाल्या ठिणग्या, LIVE VIDEO

धडक दिली अन् दुचाकीला नेलं कारने फरफटत, महामार्गावर उडाल्या ठिणग्या, LIVE VIDEO


धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चालकाने कार थांबवली नाही.

धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चालकाने कार थांबवली नाही.

धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चालकाने कार थांबवली नाही.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 15 नोव्हेंबर : पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघाताचा भयावह व्हिडीओ समोर आला आहे. एका कारने दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर कारने बाईकला फरफटत नेलं. महामार्गावर अक्षरश: आगीच्या ठिणग्या उडाल्या होत्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर सणसवाडी इथं ही घटना घडली. पुणे- नगर महामार्गावर सणसवाडी येथे एका भरधाव इंडीव्हर कारने आणि दुचाकीला जोराची धडक दिली.

जाहिरात

धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चालकाने कार थांबवली नाही. त्यानंतर दुचाकीला फरफटत नेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. दुचाकी रस्त्यावरुन फरफटत जात असताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या उडाल्या. हा सगळा प्रकार महामार्गाच्या बाजूलाा असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या अपघातात दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (याचा स्टंट म्हणजे थेट मृत्यूशी गाठ, व्हायरल Video पाहून डोक्याला लावाल हात) मागच्या अनेक दिवसांपासून पुणे नगर महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू असून अपघातानंतर पळुन जाण्याच्या नादात असे थरारक दृश्य समोर येत आहे..त्यामुळे वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. बुधवार पेठेत तरुणांवर कोयत्याने सपासप वार दरम्यान, पुण्यात गुंडाच्या पत्नीने एका तरुणाचे लिंग कापल्याची धक्कादायक घटना समोर आलेली असतानाचा पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. ( हे ही वाचा : Video : सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार… पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण ) मात्र, अजूनही पोलिसात घटनेची नोंद नाही. सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहेत. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली. दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने या बाबत चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात