मुंबई, 14 ऑगस्ट : मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस होत आहे. आता हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. राज्यात पुढचे दोन दिवसा पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने काय म्हटलं - हवामान खात्याने 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात इशारा दिला आहे. राज्यातील पुणे, सातारा घाट माथ्यावर काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच कोकणातही जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुणे शहरात परिसरात सकाळच्या सत्रात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
15 ऑगस्ट 2022 महाराष्ट्रासाठी हवामान ईशारे:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 14, 2022
पुणे, सातारा घाट माथ्यावर काही भागात मुसळधार ...कोकणातही.#पुणे शहर; सकाळच्या सत्रात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता.
🇮🇳🇮🇳🇮🇳
- आयएमडी pic.twitter.com/Oi6g4ZH4Ib
हेही वाचा - Kolhapur Sangli Rain : महापुराची धाकधुक वाढली, कोल्हापूर, सांगलीत, पाऊस थांबला पण कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवला पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी 18 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे. भंडारदरा धरण भरलं, सतर्कतेचा इशारा - गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं धरण पूर्ण भरलं आहे. सध्या धरणामध्ये 95 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून वाढत्या पावसाचा जोर पाहता पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्याद्वारे 1268 क्युसेक व विद्युत गृहाद्वारे 826 क्युसेक असा एकुण 2044 क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीपात्रात प्रवाहित केला जात आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्येही वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.