मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ज्याला पक्षाने तिकीट दिले नाही, त्याने काय गप्पा माराव्या', अजितदादांचा बावनकुळेंना सणसणीत टोला

'ज्याला पक्षाने तिकीट दिले नाही, त्याने काय गप्पा माराव्या', अजितदादांचा बावनकुळेंना सणसणीत टोला

'नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते

'नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते

'नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 08 सप्टेंबर : 'नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते ही यांची विश्वासहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या, मी खंबीर आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांना जशास तसे उत्तर दिले..

भाजपने आता पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे मोर्चा वळवला आहे. येणाऱ्या निवडणुकीत एक लाख मतांनी भाजपचा उमेदवार बारामतीतून निवडून येईल, असा दावाच बावनकुळे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अजिततादांनी आपल्या शैलीत प्रत्युउत्तर दिले.

'बावनकुळे नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते ही यांची विश्वासहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या, मी खंबीर आहे, असा सणसणीत टोला अजितदादांनी बावनकुळे यांना लगावला.

(शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटी घोटाळ्यांचा सोमय्यांचा आरोप)

तसंच, 'महाराष्ट्रात अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदारसंघ मिळतोय का बघतो, कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल, मी त्यांनाच विचारणार आहे की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का जिथे आम्ही निवडुन येऊ शकतो, असं म्हणत अजितदादांनी बावनकुळे यांची खिल्ली उडवली.

'अजूनही सरकार स्थिरस्थावर नाही, कोर्ट अजूनही तारीख पे तारीख देत आहे त्यामुळे त्यांना अजूनही कळत नाही की सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल, यांनी कितीही आव आणला तरी त्यांच्यावर टांगती तलवार आहे' असा टोलाही अजितदादांनी लगावला.

'भाजपला महागाईवर बोलता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही, भाजप लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करतात, अशी टीका अजितदादांनी केली.

(शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पितृपक्षानंतरच?)

' न्यायालय याबाबत निर्णय घेईल, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवजीपार्क वरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती आणि त्याच मैदानावरून सांगितले होते की इथून पुढे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे ही जबाबदारी निभावतील आणि तेच बाळासाहेबांचं आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे' असं म्हणत अजितदादांनी सेनेची बाजू घेतली.

'आता निवडणूका घ्यायला हरकत नाही जसं ग्रामपंचायतच्या निवडणूक जाहीर झाल्या तशाच इतरही जाहीर व्हायला हव्या. आम्ही शिवसेनेबरोबर मुंबई महापालिका निवडणूक लढव्यात ह्या मताचा मी आहे, मात्र काँग्रेचा निर्णय काँग्रेस घेईल. तज्ञांचं मत आहे की शिवसेनेचा सर्व निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल मात्र तारीख पे तारीख सुरू असल्याने आम्हालाही काही सांगता येणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

First published: