पुणे, 29 सप्टेंबर : पुण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. अर्ध्या तासाच्या पावसात पुण्यात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं. कर्वे रस्त्यावरील गरवारे कॉलेज ते डेक्कन कॉर्नर दरम्यान गुडघ्याच्यावर पाणी होतं. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे घराकडे निघालेल्या नागरिकांचे खूप हाल झाले. बाल गंधर्व, जे एम रोड, आपटे रोड येथे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. काही वेळापूर्वी पुण्यात अचानक पावसाला सुरुवात झाली होती. विजांच्या कडकडटासह मुसळधार पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर असलेल्या पुणेकरांची तारांबळ उडाली.
अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची झाली ही अवस्था... #Pune_Rain #PuneNews #Pune pic.twitter.com/e8Lls3p12D
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2022
दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात यंदा निसर्गाने शेतकऱ्यांची चांगलीच साथ दिली. सुरुवातीला कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी धूळ वाफेवर पेरण्या केल्या. नंतर सतत झालेल्या दमदार पावसाने शिवारात डौलदार पिके डोलू लागली आहेत. मात्र, अचानक संकट आले आणि पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अळी उभे पिकं फस्त करीत आहे. हाताशी आलेले पिक हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.