मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune : 3 कारणांमुळे लांबली चांदणी चौकातील पूल पाडण्याची डेडलाईन, पाहा VIDEO

Pune : 3 कारणांमुळे लांबली चांदणी चौकातील पूल पाडण्याची डेडलाईन, पाहा VIDEO

पुण्यातील चांदणी चौक पूल 18 सप्टेंबरला पाडला जाणार होता. मात्र काही कारणास्तव पूल पाडण्याची तारीख पुढे ढकलली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 16 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातील चांदणी चौक येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या नंतर चांदणी चौक येथील पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याची तयारी देखील सुरू झाली. हा पूल 18 सप्टेंबरला पाडला जाणार होता. मात्र काही कारणास्तव पूल पाडण्याची तारीख पुढे ढकलली आहे, परंतु हा पूल पाडण्यासाठी विलंब का लागत आहे आणि हा पूल नक्की कधी पाडला जाणार आहे जाणून घेऊया.

काही दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. तेव्हा त्यांच्याकडून चांदणी चौकातील पूल पाडण्याचे आदेश दिले गेले. हे आदेश अतिशय त्वरित दिल्या गेल्यामुळे पूल पाडण्याची पूर्वतयारी करण्याचा अवधी देखील प्रशासनाला मिळाला नाही. कमी अवधीमध्ये हा पूल पाडण्याच्या कामाला गती आली आहे. मात्र, कमी अवधी मिळाल्यामुळे योग्य नियोजन न करता आल्यामुळे हा पूल पाडण्याची तारीख पुढे ढकली गेली आहे.

हेही वाचा : Pune : फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स, Video

पावसामुळे कामांमध्ये व्यत्यय 

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे देखील पूल पाडण्याच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची देखील काजळी प्रशासनाला घ्यावी लागत आहे.

 रहदारीमुळे आम्हाला काम करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा

आम्ही रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जिथे जिथे गरज आहे तिथे काम करत आहोत. कारण की दिवसभर रहदारीमुळे आम्हाला काम करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. तसेच सततच्या पावसामुळे देखील कामांमध्ये व्यत्यय येत आहे. तरी देखील आतापर्यंत आम्ही 50 टक्के काम पूर्ण केले असून 22 तारखेपर्यंत आमचे पूल पाडण्याच्या पूर्व तयारीचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तसेच खूप कमी कालावधीमध्ये हे काम पूर्ण करावे लागणार असल्यामुळे त्याचा देखील ताण आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.

First published:

Tags: Pune