जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात देशातील सर्वात मोठा नैसर्गिक गवताचा गालिचा निर्मिती, रोजगारासह आहेत हे फायदे

पुण्यात देशातील सर्वात मोठा नैसर्गिक गवताचा गालिचा निर्मिती, रोजगारासह आहेत हे फायदे

फोटो क्रेडिट - लोकमत

फोटो क्रेडिट - लोकमत

पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी 1000 स्क्वेअर फुट गालिच्याची निर्मिती केली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 6 नोव्हेंबर : सध्या वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाची चर्चा केली जाते. त्यामुळे म्हणून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण हे दोन्ही मुद्दे लक्षात घेता देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाचा प्रसार व्हावा. यासाठी या नैसर्गिक गवताच्या गालीच्याची निर्मिती केली आहे. कुठे आहे हा प्रकल्प - पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी 1000 स्क्वेअर फुट गालिच्याची निर्मिती केली आहे. या गालिच्याची जागतिक स्तरावरही नोंद करण्यात आली आहे. प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीच्या जिबॉय तांबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये नैसर्गिक रित्या पर्यावरण पूरक गवतापासून गालिचा तयार करण्यात आला आहे. हा गालिचा वापरण्यासाठी ही अतिशय सोपा असून तसेच देखभाल खर्च ही अतिशय कमी आहे. दोन ते तीन दिवसातून एकदा या गालिच्याला पाणी दिले तरी हा गालिचा अत्यंत हिरवागार आणि टवटवीत राहतो. तसेच हा गालिचा केवळ घरामध्येच नव्हे तर मोठ्या स्तरावर क्रीडांगणामध्ये, उद्यानांमध्ये, गोफ कोर्समध्ये, घराच्या परसबागेमध्ये ही वापरता येऊ शकतो. पुण्यासह केरळ मधील कोचीन आंध्रप्रदेश येथील हैदराबाद या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर या गालिचाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये घरपोच हा गालिचा पर्यावरण प्रेमींपर्यंत पोहोचवण्याची सोयही करण्यात आली, अशी माहिती जिबॉय तांबी यांनी दिली. हेही वाचा -  स्वच्छता आवडते म्हणून तिनं सोडली मोठ्या पगाराची नोकरी; आता घरोघरी जाऊन फ्री करते साफसफाई तसेच पावसाचे प्रमाण अधिक असेल तरीही या गालिचामधून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. नैसर्गिकरित्या तयार करण्यात आल्याने या गालिचामध्ये कोणत्याही विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य होऊ शकत नाही. त्यामुळे हा घरामध्ये आणि बागेमध्येही अतिशय संरक्षित दृष्ट्या वापरता येऊ शकतो. या माध्यमातून रोजगार निर्मितीही - हा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर तर आहेच तसेच शारीरिक दृष्ट्याही याचे अनेक फायदे आहेत. या गालीच्या वर चप्पल न घालता चालले तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोग होतो. या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना तसेच तरुणांनाही उद्योग आणि व्यवसाय निर्मितीसाठी मदत होऊ शकेल यामधून स्थानिक तरुणांनाही रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात