पुणे 08 ऑगस्ट : रक्षाबंधन सण ( Raksha Bandhan ) हा जवळच आला आहे. या सणाच्या ( Festival ) पवित्र दिवशी बहिण भावाला प्रेमाचे बंधन म्हणून राखी बांधते. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा पवित्र सण यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. याच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत पुण्यातील मूर्तीज बेकरी कडून चॉकलेटच्या राख्या ( chocolate rakhi ) बनवण्यात आल्या आहेत. ही राखी आपण आपल्या भावाला बांधून त्याची राखी पौर्णिमा गोड नक्कीच करू शकता. पुण्यातील मूर्तीज बेकरी यांनी येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत विविध प्रकारच्या चॉकलेटच्या फुलांच्या आकारा सारख्या राख्या तयार केल्या आहेत. बहिणी आपल्या भावांसाठी येथून राखी खरेदी करून येणाऱ्या रक्षाबंधन सणाला भावाला ही चॉकलेटी राखी बांधून राखी पौर्णिमा गोड नक्कीच करू शकता. अक्षरशः 10 ते 50 रुपयांमध्ये आपण येथे राखी खरेदी करू शकता. हेही वाचा :
Pune : पुण्यातील 200 वर्ष जुने जागृत देवस्थान; श्रावणी सोमवारी होते भाविकांची गर्दी, VIDEO याबाबत मूर्तीज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी सांगितले की, आमचा मूळचा बेकरीचा व्यवसाय असून या व्यवसायामुळे आम्हाला बेकरी प्रॉडक्ट कसे बनवायचे याबद्दलची विशेष माहिती आहे. याच आमच्या ज्ञानाचा वापर करून आम्ही लहान मुलांसाठी खास या चॉकलेटच्या राख्या बनवतो. या राख्यामध्ये मिकी माऊस पासून वेगवेगळ्या आकाराच्या राख्या असतात आणि लहान मुलं आवडीने ह्या राख्या बांधतात आणि खातात देखील. गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाले असल्याने पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. बाजारात विविध प्रकारच्या राख्या जरी दाखल झाल्या असल्या तरी सध्या पुणे शहरात चॉकलेट राखीचा क्रेझ असून पुण्यातील मूर्तीज बेकरीमध्ये आकर्षक अश्या चॉकलेटच्या राख्या विक्री साठी उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे या चॉकलेट राख्या अत्यंत अल्प दरात असतात. तर या चॉकलेट राख्या सीमेवरील जवानांना देखील पाठवल्या जातात.
गुगल मॅप वरून साभार
येथे करू शकता ऑर्डर मूर्तीज बेकरी, पद्मसुंदर निवास, 399 सोमवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411001 या पत्त्यावर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी या संपर्क क्रमांकावर 7447769263 संपर्क साधू शकता.