पुणे, 25 जुलै : DHFL प्रकरणात (DHFL money laundering case) पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागील महिन्यातच अविनाश भोसले यांना ईडीने अटक केली होती. येस बँक-DHFL प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयकडून सोमवारी अविनाश भोसले आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्या, सत्येन टंडन आणि अन्य जणांविरोधात मुंबई सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी एजन्सीने आणखी एक चार्टशीट दाखल करुन दावा केला होता की, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) संगनमताने 36,614 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे पालन न करण्याचे मार्ग दाखवले आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, DHFL चे प्रमुख कपिल वाधवनने फसवणुकीच्या प्रकरणात सहआरोपी संजय छाबडियाच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करता 400 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं. अविनाश भोसले हे अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात आहे, त्याचबरोबर काँग्रेस नेते विश्वाजित कदम यांचे सासरे आहेत. याशिवाय अविनाश भोसले हे शरद पवार यांच्या जवळच्या लोकांपैकी असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तामुळे पवारांना मोठा झटका बसू शकतो. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.