जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Amol Kolhe BJP : अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या त्या निर्णयामुळे चर्चांना उधाण!

Amol Kolhe BJP : अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या त्या निर्णयामुळे चर्चांना उधाण!

Amol Kolhe BJP : अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या त्या निर्णयामुळे चर्चांना उधाण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

रायचंद शिंदे, प्रतिनिधी शिरुर, 17 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असून येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात, असंही बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी अमोल कोल्हे गैरहजर राहिले, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या एका निर्णयामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारक यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे, यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आणखी वाढल्या आहेत. मागच्या 3 वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात वेळ देत नाहीत, असा आरोप होत आहे, त्यातच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सेलिब्रिटी असल्यामुळेही अडचण होत असल्याचं बोललं जातं, त्यामुळे अमोल कोल्हे यांना मतदारसंघात विरोधकांसोबतच पक्षातील नेत्यांकडूनही टीकेला सामोरं जावं लागतं. सूत्रांची माहिती : शरद पवार ‘नावाचं’ सुपर कम्प्युटर अमोल कोल्हे मधल्या काळात भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या भाजपसोबतच्या जवळीकीला दुजोरा मिळतोय. काहीच दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला, यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली आहे. भाजप कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हे यांचं स्वागत करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , NCP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात