बारामती, 16 ऑक्टोंबर : बारामती तालुक्यात मागच्या काही काळापासून गुन्हेगारी प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तुषार लालासो भापकर (रा. कारखेल, ता. बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखेलमधीलच पिडीतेने याबाबत फिर्याद दिली. दि. 9 डिसेंबर 2021 ते 28 आॅगस्ट 2022 या कालावधीत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. 9 डिसेंबर रोजी ही महिला कारखेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड प्रतिबंधक लस घेवून पायी घरी निघाली होती. यावेळी भापकर हा मोटारसायकलने तेथे आला. त्याने ‘वहिनी मी तुम्हाला घरी सोडतो’ असे म्हणत तिला दुचाकीवर बसवले. स्वतःचे घरी नेत तुम्ही मला खूप आवडता, असे म्हणत घरात तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले.
हे ही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरेंचा फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO
‘तू ओरडलीस तर खल्लास करीन’ अशी धमकी दिली. त्याने यावेळी दोघांचे फोटो काढले. हे फोटो सगळीकडे व्हायरल करेन अशी धमकी देण्यास त्याने सुरुवात केली. तुझ्या नवऱ्याला व मुलांना खल्लास करून टाकीन असे म्हणत तिला मोरगाव, खामगळवाडी आदी ठिकाणी लाॅजवर नेत तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.
न्यूड व्हिडीओ कॉलचा पुण्यात आणखी एक बळी
पुण्यात हनी ट्रॅप प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सेक्सटॉर्शनच्या प्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यासह अन्य जिल्ह्यातही या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याच बोलले जात आहे.
हे ही वाचा : ‘ज्याने केली गद्दारी त्याला ठेचण्याची ही उत्तम संधी’; आज नक्की काय घडणार बिग बॉसच्या घरात?
पुण्यात ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. दरम्यान ती तरूणी सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या केलेला 25 वर्षीय तरुण हा धनकवडीत रहायला होता. त्याने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.