बारामती 10 ऑक्टोबर : रस्त्यावर चालताना किंवा प्रवास करताना मृत्यू कधी, कुठे आणि कोणाला गाठेल हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा रस्ते अपघाताचे असे व्हिडिओ समोर येतात, ज्यामध्ये क्षणात होत्याच नव्हतं झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या बारामतीमधील अशाच एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत बारामती शहरात वाढदिवसाच्या दिवशीच 3 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धक्कादायक! परीक्षेत नापास झाल्याने शिक्षकाने दिली क्रूर शिक्षा; पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू अरद थोरात अस मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. अरद हा त्याच्या आईसोबत बौद्ध मेळाव्यात गाणी ऐकण्यासाठी निघाला होता. हा कार्यक्रम बारामतीतील आंबेडकर पुतळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बारामती इंदापूर रस्त्यावर कार्यक्रमस्थळी जाताना वाहतूक वळवण्यात आली होती. यासाठी शिडी लावून रस्ता बंद करण्यात आला होता.
बारामती: अरद हा त्याच्या आईसोबत रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक दुचाकी आली. त्या दुचाकीने रस्त्यात आडव्या लावलेल्या शिडीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे लोखंडी शिडी अरदच्या डोक्यावर पडून त्याचा मृत्यू झाला pic.twitter.com/lDYOFpUmmh
— News18Lokmat (@News18lokmat) October 10, 2022
अरद हा त्याच्या आईसोबत रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक दुचाकी आली. त्या भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने रस्त्यात आडव्या लावलेल्या शिडीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे रस्त्यावर लावण्यात आलेली लोखंडी शिडी अरदच्या डोक्यावर जाऊन आदळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या अन् परतल्याच नाहीत, सांगलीत आईसोबत 3 मुलींचा दुर्दैवी अंत व्हिडिओमध्ये दिसतं, की काही महिला लहान मुलांसह रस्त्याच्या कडेने चाललेल्या आहेत. आसपास काही लोकही उभा आहेत. इतक्यात भरधाव दुचाकी इथे असलेल्या लोखंडी शिडीला धडक देते. यात चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. संकेत खळदकर असं भरधाव वेगाने दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ज्यादिवशी मृत्यू झाला, त्याच दिवशी अरदचा वाढदिवस होता, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं.