मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे : रक्षाबंधनाच्या दिवशी दोन वर्षीय एकुलत्या एक मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू, खेळायला गेली अन् परतलीच नाही

पुणे : रक्षाबंधनाच्या दिवशी दोन वर्षीय एकुलत्या एक मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू, खेळायला गेली अन् परतलीच नाही

फोटो - सोशल मीडिया

फोटो - सोशल मीडिया

वर्धमान चंद्रशेखर कोठारी (वय 31) हे आपली पत्नी काजल, मुलगी कनक, बहिण व इतर आप्तेष्ट, असे एकूण 25 ते 30 जण रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आले होते.

    पुणे, 15 ऑगस्ट : नुकतंच रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. मात्र, याच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक करुणाजनक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एक लहान मुलीचा पाण्यात बुडन मृत्यु झाल्याची समोर आली आहे. कनक वर्धमान कोठारी (वय 2 वर्षे 2 महिने, रा. राजलक्ष्मी को. ऑप. सोसायटी, गुलटेकडी) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - कोरेगाव मूळ येथील एका फार्महाऊसवर रक्षाबंधनाच्या कार्यक्रम होता. यासाठी आलेल्या मार्केटयार्ड परिसरातील व्यापाऱ्याच्या एकुलत्या एक लहान मुलीचा पाण्यात बुडन मृत्यु झाला. ही घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी 14 ऑगस्टला दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धमान चंद्रशेखर कोठारी (वय 31) हे आपली पत्नी काजल, मुलगी कनक, बहिण व इतर आप्तेष्ट, असे एकूण 25 ते 30 जण रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. हवेली तालुक्यातील उरूळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथील नेचर नेस्ट ॲग्रो टुरीझम या फार्महाऊसवर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते याठिकाणी आले होते. रक्षाबंधनासह दुपारपर्यंत विविध कार्यक्रम झाले. हेही वाचा - rakshabandhan दिवशी बहिणींवर संकट, राखी बांधायला जाणाऱ्या महिलांची बोट बुडाली, 50 बेपत्ता
    यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्वजण जेवण करत होते. याचवेळी कनक ही आपल्या आत्याच्या लहान मुलांसह तेथे खेळत होती. काही वेळानंतर सर्व मुले परतली. मात्र, या मुलांमध्ये कनक नव्हती. त्यामुळे सर्वानी तिचा शोध घेतला असता ती फार्महाऊसवर असलेल्या लहान पुलाजवळ पाण्यात पडलेली आढळून आली. यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिचा मृत मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
    First published:

    Tags: Death, Pune, Raksha bandhan

    पुढील बातम्या