शिरूर, 22 मे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या वाट्याला मोठ्या वेदना आल्या. शिरूर तालुक्यातही एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. उपचारासाठी मुंबईला नेता न आल्याने मुलगी गमवावी लागली अन् गावात असूनही आपल्या लेकराच्या दशक्रिया विधीला न जाता आल्याची दुर्दैवी वेळ आई-बापावर ओढावली आहे.
शिरुर तालुक्यातील चांडोह येथील अनिता पांडुरंग औटी या मुलीचं निधन झाले. मुलगी आजारी असल्यामुळे मुंबई या ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र उपचारानंतर मुंबई येथे सुविधा नसल्यामुळे मुलगी मामांच्या चांडोह या गावी आली. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे सदर मुलीला मुंबईला उपचारासाठी नेता आले नाही.
13 मे रोजी आजारी असलेल्या अनिताचे उपचाराअभावी निधन झाले. त्यानंतर आई वडील मुंबई येथून मेडिकल प्रमाणपत्र,पोलीस पास घेऊन गावी आले. तसंच तहसीलदार शिरूर यांना माहिती देऊन होम क्वॉरनटाईन मध्ये राहत होते. परंतु कोरोना दक्षता समिती यांना हे मान्य नसल्यामुळे त्यांना गावातील मराठी शाळेत राहण्यास सांगितले.
दरम्यान, आई-वडील यांना गावात असून ही दशक्रिया विधीला येता आले नाही. कोरोनामुळे ना अंत्यविधीला ना दशक्रिया विधीला, आई वडील येऊ शकले नाही. शेवटी मामांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत ठराविक लोकांमध्येच शेतामध्ये भाचीचं पिंडदान केलं.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.