आज कोरोनाच्या सावटामुळे देशभरातील महत्त्वाची देवस्थानं बंद आहेत. काही मंदिरांमध्ये पूजा, आरास अशा विधी सुरू आहे. पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर आणि पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरही आज अक्षय्य तृतीये निमित्त खास सजलं आहे
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आरास केली जाते. ही आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी देखील होत असते. यंदा मात्र चित्र वेगळं आहे
कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षय्य तृतीया मंदिरात साजरी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी हे आंबे प्रसाद ससुन रुग्णालयात रुग्णांना दिले जातात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव होणार आहे. यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीये दिवशी पंढरपुरातील विठ्ठल रुखुमाई मातेच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरुप आलं आहे
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला पंढरपूरात आज श्री विठूमाऊली आणि रखुमाईच्या गाभाऱ्याला हापूस आंब्याची आरास केली आहे. सावळा विठ्ठल आज आमराईत असल्याचे दिसत आहे.
आज अक्षय्य तृतीया असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस आंब्याची आरास केली आहे. याठिकाणी प्रत्येक सणानिमित्त फुलांची सजावट केली जाते. पण सध्या आंब्याचे दिवस असल्याने सजावट करण्यासाठी आंब्याचा उपयोग केला आहे.
पुणे येथील विठ्ठलाचे भक्त विनायकशेठ काची (बुंदेले) यांच्याकडून ही आरास करण्यात आली असून संपूर्ण सजावट मे. किसन सिताराम आणि ब्रदर्स पुणे यांनी साकारली आहे.
यंदा भाविकांना विठ्ठलाचं हे रुप याचि देही याचि डोळा पाहता येणार नाही आहे. तरी देखील या फोटोंच्या माध्यमातून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत
विठूरखुमाई मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होतात, पण यावर्षी कोरोनाचं सावट आहे