जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी

आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी

आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो - नरेंद्र मोदी

‘हिंजवडीतली वाहतूक कोंडी फोडून ताण लवकरच कमी करणार असून आयटीतल्या तरुणांना आवडेल असं शहर तयार करू’

  • -MIN READ
  • Last Updated :

    **पुणे,18 डिसेंबर :**पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या तीसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन झालं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे यांचं स्मरण केलं. पुणे ही बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी आहे अशी आठवणही पंतप्रधानांनी केली. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो असंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले, केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीनं पायाभूत सुविधा विकसित करत आहे. पुण्यात लोकांना वाहतूक कोंडीचा दररोज सामना करावा लागतोय. त्यांचा खूप वेळ वाया जातो. या प्रकल्पामुळे लोकांना वाहतूकीचा त्रास होणार नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर आत्तापर्यंत मुंबई आणि पुण्यात मेट्रो सुरू झाली असती असंही ते म्हणाले. पुण्याला स्मार्ट करणार - मुख्यमंत्री हिंजवडीतली वाहतूक कोंडी फोडून ताण लवकरच कमी करणार असून आयटीतल्या तरुणांना आवडेल असं शहर तयार करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलं. गेल्या 70 वर्षात मिळला नाही एवढा निधी भाजप सरकारने दिला असंही ते म्हणाले. हिंजवडी हे पुण्याचं नाही तर देशाचं आयटी हब आहे. दररोज दोन लाख लोक पुण्यातून हिंजवडीला येतात. पण मुलभूत सोयी नसल्यानं प्रचंड गैरसोय सहन करावी लागते.  रस्ते छोटो असल्यानं इथं लोकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. ही कोंडी फोडण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड असणार आहे. मेट्रो 3 ची स्टेशन्स पुणे विद्यापीठ, टायग्रीस कॅम्प व पुणे ग्रामीण पोलीस, आकाशवाणी आणि हवामान विभाग, आरबीआय, शिवाजीनगर न्यायालय पार्किंग, सेंट्रल बी रिसर्च व ट्रेनिंग सेंटर, शासकीय तंत्रशिक्षण विभाग,  पोलीस भरती मैदान, सीओईपी होस्टेल, कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय. मेट्रो - 3 ची वैशिष्ट हिंजवडी ते शिवाजीनगर - 23 किलोमीटर मार्ग  एकूण स्थानके - 23  प्रकल्पाची किंमत - 3 हजार 313 कोटी   केंद्र सरकार - 20 टक्के निधी  राज्य सरकार - 20 टक्के निधी  खासगी कंपन्यांचा वाटा - 60 टक्के   तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करणार   प्रवासी क्षमता 33 हजार प्रवासी VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात