मुंबई, 22 मार्च: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारच्या अडचणी वाढतचं चालल्या आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना निलंबित केल्यानंतर मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Param Bir singh) यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची डीजी होमगार्ड पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Governmet) आणि विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या विरोधात उघडपणे मोर्चा उघडला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यावर 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप लावला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला पुरतं धारेवर धरलं आहे. अशातच (IPS officer in supreme court) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आणखी एका IPS अधिकाऱ्यानं आव्हान दिलं आहेत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पोलीस विभागाच्या डीजी स्तरावर अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे डीजी संजय पांडे यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डीजी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आपल्याला डीजी न केल्याबद्दल संजय पांडे (Sanjay pandey IPS officer) यांनी सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचं ठरवलं आहे. पोलीस विभागाच्या आदर्शाला हानी संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, ते पोलीस खात्याच्या आदर्शवादाला खाली खेचत आहे. त्याचबरोबर एक सक्षम अधिकारी असूनही, त्यांच्या जागी दुसर्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणं कुठे ना कुठेतरी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. हे ही वाचा- Mansukh Hiren case मनसुख यांना बोलावणारा तावडेच होता विनायक शिंदे, ATS चा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केले आरोप महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, रश्मी शुक्ला या सक्षम अधिकारी असूनही त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांना साइड पोस्टिंग देण्यात आली आहे. कारण रश्मी शुक्ला यांनी बदल्या आणि नियुक्त्या संदर्भात मोठा रिपोर्ट तयार केला होता. त्यांनी प्रत्येकाची ऑडिओ रेकॉर्डिंग करून त्याची एक फाइल बनवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. पण ठाकरे सरकारने संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचीच उचलबांगडी केली आहे. त्यांना चालू पदावरून काढून त्यांची साइड पोस्टिंग केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.