Home /News /pune /

पुण्यात नुकतेच परदेशातून 438 नागरिक परतले; महापौरांचं मोठं आवाहन

पुण्यात नुकतेच परदेशातून 438 नागरिक परतले; महापौरांचं मोठं आवाहन

पुणे (Pune News) शहरामध्ये ओमायक्रॉनचा (Omicron cases in Pune) पहिला रुग्ण आढळला आहे.

    पुणे, 5 डिसेंबर : पुणे (Pune News) शहरामध्ये ओमायक्रॉनचा (Omicron cases in Pune) पहिला रुग्ण आढळला आहे. महानगरपालिकेने सर्व खबरदारी घेतली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महापौर यांनी केलं आहे. परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्या तरी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR चाचणी करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुणे महानगरपालिकेने सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं, आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. नायजेरियातील लेगॉस शहरातून आलेली एक 44 वर्ष वय असलेली महिला आणि तिच्या 12 आणि 18 वर्षे वय असलेल्या दोन मुली सोबत तिच्या सहवासात असलेल्या इतर तीन जणांना ओमायक्रॉन व्हायरसची लागण झाल्याचा अहवाल एनआयवीने आज संध्याकाळी दिला. 24 नोव्हेंबरला नायजेरियातील लेगॉस शहरातून एक महिला आपल्या बारा आणि एक अठरा वर्षाच्या मुलीसोबत पिंपरी-चिंचवड मध्ये आपल्या भावाला भेटायला आली होती, त्या दरम्यान एअरपोर्टवर केलेल्या rt-pcr चाचणीत ही महिला आणि तिच्या दोन मुली कोरोना बाधित असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली होती. हे ही वाचा-महापरिनिर्वाण दिनावरही ओमायक्रॉनचं संकट; प्रकाश आंबेडकरांनी केलं आवाहनं त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने नायजेरियातुन आलेल्या तीन जणांचे आणि त्यांच्या सहवासात असलेल्या काहीजणाचे अहवाल एनआयवीकडे पाठवले होते. त्यात ही नायजेरिया आतून आलेली महिला आणि तिच्या दोन मुली ओमायक्रॉन वायरसने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. नायजेरियातून पिंपरी-चिंचवड मध्ये आलेली महिला ही आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. त्यामुळे तिच्या निकट सहवासात आलेला तिचा भाऊ आणि त्यांची दोन मुले देखील ओमायक्रॉन वायरसने ग्रस्त झाली आहेत. त्याचबरोबर पुण्यात 19 ओमायक्रॉन व्हायरस ग्रस्त रुग्ण आढळून आल आहे. 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान हा युवक फिनलँड याठिकाणी गेला होता. त्यानंतर पुण्यात तो परत आल्यानंतर त्याच्यामध्ये ओमायक्रोन वायरसची लक्षणे आढळून आली आहेत. ओमायक्रोन व्हायरसग्रस्त सर्व रुग्णांची प्रकृती सध्या अस्थिर असून पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेल्या सहा रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटलमधील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सूरु असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona updates, Pune

    पुढील बातम्या