मुंंबई, 21 जून : दिल्लीत एव्हिअन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) एका 11 वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये (AIMS Hospital) उपचार सुरू असताना या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील एम्समधील पूर्ण स्टाफला सध्या आयसोलेट (Hospital staff isolated) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बर्ड फ्लू हा मुख्यत्वे पक्ष्यांना होणारा आजार असून तो सहजासहजी माणसांना होत नाही. मात्र माणसांना हा आजार झालाच, तर 60 टक्के माणसं त्यात दगावतात, असं आतापर्यंतचं निरीक्षण आहे.
बर्ड फ्लूची दहशत
या वर्षाच्या सुरुवातीला देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या होत्या. मात्र मुख्यत्वे कोंबड्या आणि बदकांना हा रोग होतो आणि पक्षी दगावतात. जगातील फार कमी देशांमध्ये याची लागण मनुष्याला होते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. मात्र लागण झाल्यावर हा रोग भयंकर ठरत असल्याचंही दिसून आलं आहे. या रोगाचा आतापर्यंत नोंदवला गेलेला मृत्यूदर हा 60 टक्के इतका भयंकर आहे. म्हणजेच हा रोग झालेल्या 100 पैकी 60 माणसं दगावतात, असं आतापर्यत दिसून आलं आहे.
Avian influenza's symptoms vary from nasal discharge, sneezing & body ache & they do result in respiratory failure. Human transmission is rare. It can be seen in children &young adults: Dr Rajesh Chawla, Sr Consultant Pulmonology&Critical Care, Indraprastha Apollo Hospital, Delhi pic.twitter.com/mOaWXVaVrx
— ANI (@ANI) July 21, 2021
ही आहेत लक्षणं
यातील काही लक्षणे ही कोरोनाप्रमाणे आहेत, कारण दोन्ही आजारांच्या विषाणूंचा मूळ प्रकार एकच असल्याचं सांगितलं जातं.
हे वाचा -धक्कादायक! कोल्हापुरात घरात सुरू होतं बेकायदेशीर गर्भलिंग निदान
काळजी घेण्याचं आवाहन
राज्यात सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. याशिवाय डॉक्टरांनीदेखील सध्या चिकन आणि अंडी खाताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. जिवंत कोंबडी किंवा पक्ष्यांच्या संपर्कात न येणे, मांस शिजवण्यासाठी भांडी वेगळी ठेवणे, शक्यतो मांसाहार टाळणे, बर्ड फ्लू झालेल्यांच्या संपर्कात न येणे अशी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bird flu, Rajesh tope