जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; परभणीत वादळी वाऱ्यात भलंमोठं झाड कोसळलं, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; परभणीत वादळी वाऱ्यात भलंमोठं झाड कोसळलं, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यात भलंमोठं झाड कोसळलं, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यात भलंमोठं झाड कोसळलं, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

tree fall down in strong winds incident caught in camera: वादळीवाऱ्यामुळे एक भलंमोठं झाड कोसळल्याची घटना परभणीत घडली आहे. झाड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

परभणी, 9 जून : मान्सून पुढील 48 तासांत महाराष्ट्रात एन्ट्री (Monsoon in Maharashtra) करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पाऊस (pre monsoon shower) बरसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार माजवला आहे. परभणीत (Parbhani) सुद्धा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात एक भलंमोठं झाड कोसळलं आहे. झाड कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद परभणी शहरासह जिल्ह्यला मान्सूनपूर्व वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. वादळात झाड तुटून रस्त्यावर धावत असलेल्या ऑटो आणि मोटार सायकलवर पडल्याचा व्हिडीओ न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे. परभणी शहरातील वसमत रोडवर हा प्रकार घडला असून, सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालेलं नाहीये.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री झालेल्या वादळ वाऱ्यामुळे, हे झाड कमकुवत झालं आणि आज सकाळच्या सुमारास हे झाड अचानक पडले. ज्यात ऑटो आणि मोटरसायकलचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. पुढच्या 48 तासांत राज्यात मान्सून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे. 31 मे ते 7 जून दरम्यान मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापल्याचे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले. मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल असं हवामान विभागाने सांगितले. वाचा :  नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, 48 तासांत उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू? पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 9 जून कोकण - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. 10 जून कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात