Home /News /maharashtra /

Prakash Amate : ‘प्रकाशवाटा’ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, प्रकाश आमटेंची प्रकृती खालावली पुन्हा रुग्णालयात दाखल

Prakash Amate : ‘प्रकाशवाटा’ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, प्रकाश आमटेंची प्रकृती खालावली पुन्हा रुग्णालयात दाखल

समाजसेवक प्रकाश आमटे (social worker prakash amate) यांना पुन्हा एकदा पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल (pune dinanath mangeshkar hospital) करण्यात आले.

  मुंबई, 28 जून : समाजसेवक प्रकाश आमटे (social worker prakash amate) यांना पुन्हा एकदा पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल (pune dinanath mangeshkar hospital) करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांचा मुलगा अनिकेत आमटे (son aniket amate) यांनी दिली आहे. प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचे (Hair cell leukemia blood cancer) निदान झाल्याने १३ जून रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होते. मंगळवारी 28 जून रोजी पुन्हा ताप आल्याने परत भरती करण्यात आल्याचे मुलगा अनिकेत यांनी सांगितले आहे. 

  प्रकाश आमटे यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर येत आहेत. यामुळे उपचारामध्ये अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मुलगा अनिकेत यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे. डॉक्टरांकडून सर्व व्हिजिटर्सना प्रवेश पूर्ण बंद केला आहे. बाबांच्या फोनवर कॉल करू नये. त्यांना अजून खूप ताप आहे. गेले ५ दिवस पुन्हा इन्फेक्शन झाले आहे. २८ रोजी काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट सोशल मीडियावर माहिती दिली जाईल. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कॉल करून त्रास देऊ नये, असे आवाहन अनिकेत आमटे यांनी केले आहे.

  हे ही वाचा : ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, राज्यपालांच्या भेटीत फडणवीसांकडून मोठी मागणी

  अनिकेत आमटे काय  म्हणाले?

  बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत.

  हे ही वाचा : Pune Shiv Sena : पुणे शिवसेनेला मोठा धक्का माजी मंत्री होणार शिंदे गटात सामील, दोन्ही काँग्रेसकडून त्रास होत असल्याचा आरोप

  माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला. 🙏🏻 अनिकेत आमटे

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Cancer, Prakash amte, Pune (City/Town/Village)

  पुढील बातम्या