मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतच राहतात -प्रकाश आंबेडकर

गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतच राहतात -प्रकाश आंबेडकर


लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली.

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली.

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली.

    नितीन बनसोडे,प्रतिनिधी

    लातूर,09 डिसेंबर : केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भारिपने प्रकाश आंबेडकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. गल्ली बोळातील नेत्यांवर असे छोटेमोठे हल्ले होतच राहतात असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते लातूरमध्ये बोलत होते.

    लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला याबद्दल विचारले असता, प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत आपलं मत व्यक्त केलं. गल्ली बोळातील नेत्यांवर असे छोटेमोठे हल्ले होतच राहतात अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली.

    तर दुसरीकडे माजी खासदार आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आठवले यांना सल्लावजा टोला लगावला.

    रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या प्रकारे संविधान संपवण्याचा डाव भाजप आणि संघाकडून सुरू आहे. त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांना राग येणे हे साहजिकच आहे असं नाना पटोले म्हणाले.

    तसंच आठवले यांच्यावर हल्ला झाला याचं मी समर्थन करणार नाही. पण रामदास आठवले यांनी समजलं पाहिजे की, जे संविधान संपवायला निघाले त्यांच्यासोबत राहिलं नाही पाहिजे याची सबब त्यांना यातून मिळाली असेल असा टोलाही त्यांनी लगावला. जे संविधान संपवायला निघाले त्यांचे असेच हाल होणार याचं चित्र आतापासूनच दिसायला लागलं आहे असंही पटोले म्हणाले.

    दरम्यान, रामदास आठवले यांना शनिवारी रात्री मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण गोसावीला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रवीण गोसावीवर मुंबईच्या जे .जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा रिपाइंचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. रिपाइंच्या अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला होता. तसंच तो अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहे. रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली ती प्रवीणला पटत नव्हती. या रागातून त्याने शनिवारी आठवले यांच्यावर हल्ला केला होता.

    =============================

    First published:

    Tags: Nana patole, Prakash ambedkar, Praveen gosavi, Ramdas athawale, Ramdas athawale attack, Ramdas athawale news, RPI